गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात इंडक्शन कार्यक्रमाचा उत्साहात


जळगाव— गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय, जळगाव येथे नव्याने प्रवेश घेतलेल्या प्रथम वर्ष अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या इंडक्शन (प्रवर्तन) कार्यक्रमाची सुरुवात उत्साहपूर्ण वातावरणात झाली. विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन शैक्षणिक वातावरणाची, विविध सुविधा व संधींची तसेच महाविद्यालयातील विविध उपक्रमांची माहिती करून देणे हा या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश होता.कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवर प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील, अधिष्ठाते, विभागप्रमुख, प्राध्यापकवृंद आणि विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. द्वितीय वर्ष कृत्रिम बुद्धिमत्ता व डेटा सायन्स शाखेचे विद्यार्थी चेतन चौधरी आणि ऋषिकेश पाटील यांनी बलसागर भारत होवो हे देशभक्तीपर गीत सुरेल आवाजात सादर केले. यानंतर गोदावरी फाउंडेशन तसेच गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाची शैक्षणिक परंपरा, विविध शैक्षणिक संधी, उपलब्ध सुविधा, पायाभूत सुविधा आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणार्‍या विविध उपक्रमांची माहिती विद्यार्थ्यांना करून देण्यात आली. बेसिक सायन्सेस अँड ह्युमॅनिटीज विभागाचे विभागप्रमुख डॉ. नितीन भोळे यांनी अभियांत्रिकीच्या चार वर्षांचा कालावधी अत्यंत महत्त्वाचा असून त्याचा योग्य आणि नियोजनबद्ध वापर करावा, असे आवाहन केले. प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांनी प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे स्वागत करून अभियांत्रिकी प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अभ्यासक्रमातील तसेच अभ्यासक्रमाबाहेरील उपक्रमांचे महत्त्व तसेच महाविद्यालयातील अत्याधुनिक पायाभूत सुविधा, प्रयोगशाळा, ग्रंथालय, संशोधन व नवोपक्रमाच्या संधी, क्रीडा सुविधा तसेच विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध विविध सुविधा यांची माहिती विद्यार्थ्यांना दिली. चेतन चौधरी यानी आभार मानले. सूत्रसंचालन द्वितीय वर्ष विद्युत अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थिनी राजश्री यादव आणि आदित्य भिरूड यांनी केले. दुसर्‍या सत्रात प्रशिक्षण व रोजगार विभागप्रमुख डॉ. विजयकुमार वानखेडे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांनी प्लेसमेंटची तयारी, आवश्यक कौशल्ये आणि करिअर विकास याबाबत मार्गदर्शन केले. तिसर्‍या सत्रात डॉ. हेमंत इंगळे, अधिष्ठाता — संशोधन व नवोपक्रम तसेच इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन अभियांत्रिकी विभागप्रमुख यांनी स्वयम एनपीटीईएल या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्या कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व अधिष्ठाते, विभागप्रमुख, प्राध्यापकवृंद आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. त्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत प्राप्त झाली.इंडक्शन (प्रवर्तन) कार्यक्रम हा बेसिक सायन्सेस आणि ह्युमॅनिटीज विभागाने यशस्वीरित्या आयोजित केला.समन्वयक प्रा. प्रविण सोनवणे आणि प्रा. पूनम वाणी बेसिक सायन्सेस अँड ह्युमॅनिटीज विभागप्रमुख डॉ. नितीन भोळे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन करण्यात आले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. खुशाली बेलदार यांनी केले.इकार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, डॉ.वर्षा पाटील (सचिव), डॉ. केतकी पाटील (सदस्य), डॉ. वैभव पाटील (डीएम कार्डिओलॉजिस्ट) व डॉ. अनिकेत पाटील यांनी कौतुक केले


 

 

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!