जळगाव (प्रतिनिधी) : गोदावरी फाऊंडेशन संचलित गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योग प्रात्याक्षिकांचे योगा फॉर हेल्दी एजिंग या थीम अंतर्गत योग दिनाचे आयोजन करण्यात आले होते.
महाविद्यालयाच्या योगा हॉलमध्ये गोदावरी अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील, अधिष्ठाता डॉ. तुषार कोळी व तंत्रनिकेतन समन्वयक प्रा. दीपक झांबरे तसेच योगशिक्षक डॉ. अतुल बर्हाटे सर्व विभागप्रमुख व प्राध्यापक वर्ग उपस्थीत होते. योग प्रात्याक्षिकासाठी गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे डॉ. अतुल बर्हाटे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व प्राध्यापकवृंद यांनी योग प्रात्याक्षिक केले. ताडासन, वृक्षासन, पादहस्तासन, बद्धकोणासन, व्रजासन, मंडुकासन, त्रिकोणासन, शवासन तसेच प्राणायाममध्ये कपालभाती,अनुलोम विलोम, भ्रामरी हे प्राणायाम करुन घेतली. तसेच योगासने केल्याने होणारे फायदे यावर प्रकाश टाकला. या उपक्रमाबाबत गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, सदस्य डॉ. केतकी पाटील व डॉ. वैभव पाटील(डीएम कार्डिओलॉजिस्ट) यांनी कौतुक केले. या उपक्रमात महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला.