जळगाव ( प्रतिनिधी ) – भारताचे माजी राष्ट्रपती व भारतरत्न एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्ताने गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन येथे वाचन प्रेरणा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी वकृत्व व वाचन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी े अधिष्ठाता डॉ. तुषार कोळी तसेच सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापक वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते. डॉ.पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आपल्या विचारमंथनात सांगितले की वाचन ही फक्त सवय नसून ती व्यक्तिमत्त्व विकासाची पायरी आहे. वाचनामुळे विचारांची दारे उघडतात, आत्मविश्वास निर्माण होतो आणि सृजनशीलतेला दिशा मिळते. या वेळी वक्तृत्व स्पर्धा व वाचन स्पर्धांमधील विजेत्या विद्यार्थ्यांचा गौरव प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांच्या हस्ते ट्रॉफीज देऊन करण्यात आला.
वाचन प्रेरणा स्पर्धेचे विजेते
प्रथम- संजना गवई (द्वितीय वर्ष इ अँन्ड टीसी ) द्वितीय – श्रद्धा मराठे वकृत्व स्पर्धेचे विजेते प्रथम – रिद्धी भिरूड (प्रथम वर्ष संगणक) द्वितीय – रुचिका पाटील – (प्रथम वर्ष आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डाटा सायन्स) वाचन प्रेरणा दिनानिमित्त महाविद्यालयात विविध विभागांमध्येही प्रेरणादायी साहित्य प्रदर्शन ठेवण्यात आले होते, ज्याचा विद्यार्थ्यांनी लाभ घेतला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी
प्रा.नकुल गाडगे यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांना प्राध्यापकवर्ग तसेच विद्यार्थी वर्गाचे उत्स्फूर्त सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे पर्यवेक्षक म्हणून प्रा.शिरीन पिंजारी, प्रा. किरण बाविस्कर व प्रा. राजनंदिनी चौधरी यांनी काम पाहिले.तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भूमिका चौधरी (प्रथम वर्ष संगणक) या विद्यार्थिनीने केले.सदर उपक्रमाबाबत गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, डॉ. वर्षा पाटील(सचिव), डॉ. केतकी पाटील(सदस्य), डॉ. वैभव पाटील (डीएम कार्डिओलॉजिस्ट), डॉ. अनिकेत पाटील यांनी कौतुक केले.