• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जीएमसी येथे “बेसिक लाईफ सपोर्ट”चे जनतेला प्रशिक्षण

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 18, 2023
in आरोग्य, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0

जीवन संजीवनी सप्ताह अंतर्गत उपक्रम

बधिरीकरण शास्त्र विभागाच्या नूतन विभागाचीही सुरुवात

जळगाव (प्रतिनिधी) :- येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात बधिरीकरण शास्त्र (भूलशास्त्र) विभागातर्फे जीवन संजीवनी सप्ताह अंतर्गत बेसिक लाईफ सपोर्टचे प्रशिक्षण जनतेला ओपीडी इमारतीत देण्यात येत आहे. त्याची सुरुवात प्रभारी अधिष्ठाता डॉ. किशोर इंगोले यांच्या हस्ते सोमवारी १६ ऑक्टोबर रोजी करण्यात आली. तसेच, बधिरीकरण शास्त्र विभागाच्या नूतन विभागाची प्र. अधिष्ठाता डॉ. इंगोले यांनी फित कापून सुरुवात केली.

रुग्णालयामधील बाह्यरुग्ण विभागात जीवन संजीवनी सप्ताह (दि. १६ ते २१ ऑक्टोबर) हा जनजागृती कार्यक्रम घेण्यात येत आहे. सोमवारी सकाळी प्रभारी अधिष्ठाता डॉ. किशोर इंगोले, पदव्युत्तर अधिष्ठाता डॉ. मारुती पोटे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय गायकवाड, विभाग प्रमुख डॉ. सुरेखा चव्हाण उपस्थित होते. सुरुवातीला प्रस्तावनेतून डॉ. चव्हाण यांनी सप्ताहाविषयी माहिती दिली.

बधिरीकरण शास्त्र विभागातर्फे जीव रक्षकाचे प्रशिक्षण देणेसाठी  रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागांमध्ये रोज सकाळी १० ते १ या वेळेमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. यामध्ये रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना बेसिक लाईफ सपोर्ट या विषयीचे प्रात्यक्षिक आणि प्रशिक्षण भूलतज्ञांद्वारे दररोज देण्यात येत आहे. साधारणपणे ५०० रुग्णांना आणि २०० कर्मचाऱ्यांना असे एकूण ७०० लोकांना जीव संरक्षणाचे प्रशिक्षण देण्यात येण्याचे उद्दिष्ट आहे.

जनजागृती प्रशिक्षणकरिता विभागप्रमुख डॉ. सुरेखा चव्हाण ढमढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली विभागातील सहयोगी प्राध्यापक डॉ. राजेश सुभेदार, सहाय्यक प्राध्यापक डॉ. हर्षद महाजन, सहाय्यक प्राध्यापक डॉ. माधुरी पाटील, डॉ. वैभव सोळंके, डॉ. चेतन आद्रट, डॉ. अंजू पॉल, डॉ. प्रियंका लाडोले तसेच पदव्युत्तर विद्यार्थी आणि आंतरवासिता डॉक्टर्स हे परिश्रम घेत आहे.

जीवन संजीवनी सप्ताहनिमित्ताने बधिरीकरण शास्त्र विभागाची नवीन इमारतीमध्ये स्थापना होणार आहे. त्यासाठी विभागाची सुरुवात प्रभारी अधिष्ठाता डॉ.  किशोर इंगोले यांच्या उपस्थितीत करण्यात आली. प्रसंगी डॉ. इंगोले यांनी, भूलशास्त्र विभागाच्या उपक्रमांचे कौतुक करीत रुग्णांना शस्त्रक्रियाकामी भूलशास्त्र विभाग महत्वाची भूमिका बजावत असते असे सांगितले. यावेळी विविध विभागप्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमासाठी विभागातील स्टाफसह लघुलेखक दिलीप मोराणकर, गोपाल सोळंकी, साहेबराव कुडमेथे, ज्ञानेश्वर डहाके, जनसंपर्क सहायक विश्वजीत चौधरी, राकेश सोनार, अजय जाधव, प्रकाश पाटील आदींनी परिश्रम घेतले.

 

https://kesariraj.com/wp-content/uploads/2023/10/WhatsApp-Video-2023-10-18-at-14.31.48.mp4


 

 

Tags: #gmcjalgaon news #maharashtrahttps://kesariraj.com/gmci-yethe-besik-lafe-saport/
Previous Post

मनुदेवी मंदिर ट्रस्टच्या सर्व दान पेट्या सील ; धर्मादाय आयुक्तांची कारवाई

Next Post

महिलेची गळफास घेऊन आत्महत्या ; कारण अस्पष्ट

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

महिलेची गळफास घेऊन आत्महत्या ; कारण अस्पष्ट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सामाजिक सुरक्षिततेच्या दृष्टीने भरोसा सेल ठरणार महत्वाचा : पालकमंत्री गुलाबराव पाटील
Uncategorized

सामाजिक सुरक्षिततेच्या दृष्टीने भरोसा सेल ठरणार महत्वाचा : पालकमंत्री गुलाबराव पाटील

March 8, 2026
स्त्री शक्तीने शहराच्या प्रगतीत योगदान द्यावे, संसाराच्या रहाटगाड्यात स्वतःला देखील वेळ देऊन निरोगी राहावे..!
Uncategorized

स्त्री शक्तीने शहराच्या प्रगतीत योगदान द्यावे, संसाराच्या रहाटगाड्यात स्वतःला देखील वेळ देऊन निरोगी राहावे..!

March 8, 2026
गावठी पिस्टलची तस्करी करणाऱ्या आंतरराज्यीय  टोळीचा पर्दाफाश
1xbet russia

गावठी पिस्टलची तस्करी करणाऱ्या आंतरराज्यीय  टोळीचा पर्दाफाश

March 7, 2026
सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका
1xbet russia

महापौरांच्या आदेशानंतर प्रशासनाची कार्यवाही : जळगाव महानगरपालिकेत मालमत्ता कराबाबत कठोर पावले !

March 7, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

सामाजिक सुरक्षिततेच्या दृष्टीने भरोसा सेल ठरणार महत्वाचा : पालकमंत्री गुलाबराव पाटील

सामाजिक सुरक्षिततेच्या दृष्टीने भरोसा सेल ठरणार महत्वाचा : पालकमंत्री गुलाबराव पाटील

March 8, 2026
स्त्री शक्तीने शहराच्या प्रगतीत योगदान द्यावे, संसाराच्या रहाटगाड्यात स्वतःला देखील वेळ देऊन निरोगी राहावे..!

स्त्री शक्तीने शहराच्या प्रगतीत योगदान द्यावे, संसाराच्या रहाटगाड्यात स्वतःला देखील वेळ देऊन निरोगी राहावे..!

March 8, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon