यावल ( प्रातिनिधी ) – येथील माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक अतुल पाटील व त्यांच्या सहकार्यांनी शिक्षक दिनी शहरातील गुरुजनांचा त्यांच्या घरी जाऊन शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला.

नगरसेवक अतुल पाटील यांनी शहरातील ७८ शिक्षकांना तथा सेवानिवृत्त शिक्षक, शिक्षीकांना सन्मानित केले, या शिक्षक सन्मान कार्यक्रमात सामाजिक
कार्यकर्ते एजाज देशमुख, हाजी फारुख मोमीन, गणेश महाजन, आशिष पाटील , शब्बीर तडवी, गणेश जोशी, मोसिन कुरेशी, भरत कोळी, प्रशांत पाटील, उदय पाटील यांनी सहभाग घेतला . यावेळी अतुल पाटील यांचे गुरू तथा आदीवासी तडवी भिल्ल एकता मंचाचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष व सेवानिवृत्त
मुख्याध्यापक एम. बी. तडवी यांनी अतुल पाटील यांनी केलेले कार्य हे अतुलनिय असल्याचे म्हटले.







