पारोळा ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील मेहू येथे घरफोडी करणारी टोळी जळगावच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पकडली आहे .
पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे यांच्या सुचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी नेमलेल्या पथकाने ही टोळी पकडली . या पथकाकडे पारोळा पोलीस स्टेशन मधील रजि.नं. ४०१/२०२१ भादवि कलम ४५७,३८० या गुन्ह्याबाबत तपास सोपविण्यात आला होता . गुप्त बातमीदारा मार्फत मिळालेल्या बातमी वरून स्थानिक गुन्हे शाखेचे पो.ह. संदिप पाटील, पो.ना. प्रविण मांडोळे पो.ना. नंदलाल पाटील, पो.ना. भगवान पाटील, पो.ना. राहुल बैसाणे, पो.कॉ. सचिन पाटील, पो.ह. संदिप साळवे, पो.कॉ. ईश्वर पाटील, .पो.ना.अशोक पाटील, पो.कॉ. मुरलीधर बारी यांचे पथकाने मेहु येथील कृष्णा अभिमन वाघ (भिल), विशाल जगदिश पाटील, रोहीत सुनिल पाटील यांना विश्वासात घेवून चौकशी केली त्यांनी दिलेल्या कबुलीनुसार या गावातील योगेश चव्हाण यांचे घराच्या किचनच्या खिडकीतून आरोपी कृष्णा वाघ घरात उतरला व आतुन लावलेली कड़ी उघडुन त्याचे साथिदार विशाल पाटील, रोहीत पाटील यांना घरात घेवून फिर्यादी योगेश चव्हाण यांचे १२०००/- रुपये रोख व विवो कंपनीचा मोबाईल फोन चोरी केल्याची कबुली दिली आहे . या आरोपींना
ताब्यात घेवून मुद्दे मालासह पारोळा पोलीस स्टेशन यांचे ताब्यात दिले आहे.