जळगाव (प्रतिनिधी ) ;- बलात्काराच्या गुन्ह्यातून जामिनावर सुटलेल्या आरोपीने दुसऱ्याच दिवशी घरफोडी केली होती. या आरोपीला त्याच्या साथीदारांसह
पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांना माहिती मिळाल्यावर त्यांना सहाय्यक फौजदार अतुल वंजारी ,इम्रान सय्यद, मुदस्सर काझी ,गोविंदा पाटील, सुधीर साळवे ,साईनाथ मुंडे, यांनी अटक केली होती. त्यापैकी एक अल्पवयीन याला सुद्धा ताब्यात घेतले होते . सदर मोहन सिंग याच्यावर घरफोडीचे बरेच गुन्हे दाखल असून त्याचे संपूर्ण भावाविरुद्ध सुद्धा घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. त्याला काल गुन्हा कामी अटक करण्यात आली होती. आज रोजी न्यायमूर्ती ए एस शेख यांच्या न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दिनांक सहा पावेतो पोलिस कस्टडी रिमांड दिली असून सरकारतर्फे अँड. प्रिया मेढे यांनी कामकाज पाहिले. सदर आरोपींना दिनांक ६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांच्याकडून गुन्ह्यातील त्यांनी चोरलेली सोन्याची अंगठी हस्तगत करण्यात आली असून त्यांना आज रोजी तपासी अधिकारी सहाय्यक फौजदार अतुल वंजारी यांनी न्यायालयात हजर केले असता न्यायमूर्ती ए एच शेख यांनी एक दिवसाची पोलिस कस्टडी रिमांड दिली असून सरकारतर्फे अँड. प्रिया मेढे यांनी कामकाज पाहिले.








