उमाळा शिवारातील घटना ; दोघांवर गुन्हा दाखल
जळगाव ;– न्यायालयाचे आदेश असतानाही शेतातून ये- जा करण्यास मनाई आदेश असताना ते सांगण्यास गेले असता काकाला आसारीने आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करून पुतण्याला विळ्याने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना उमाळा येथे घडली आहे .
याबाबत सूत्रांची दिलेली माहिती अशी कि
फिर्यादी शिवाजी भिका खडसे, वय- ४० वर्षे, व्यवसाय- शेती, रा- उमाळा,
हे पत्नी सो. योगीताबाई, मुले नरेश व प्रशांत अशांसह राहतो. माझी उमाळा शिवारात शेती असुन सदरची शेती करुन त्यावर मी उदरनिर्वाह चालवितात . त्यांच्या शेतीला लागुनच गावातील शिवाजी रामदास मनोरे यांची शेती असुन आमच्या शेतातुन रस्ता नसतांना देखील ते आमच्या शेतातुन ये-जा करीत असल्याने कोर्टात दावा दाखल केला होता कोर्टाने त्यांना शेतातुन ये-जा करण्यास मज्ज्ञाव केल्याचा आदेश दिला असताना
आज २३ रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास शिवाजी रामदास मनोरे यांच्या घरासमोर शिवाजी भिका खडसे गेले असताना त्यांनी कोर्टाने तुम्हाला आमच्या शेतातुन ये-जा करण्यासाठी बंदीचा आदेश दिला आहे तरी तुम्ही यापुढे माझ्या शेतातुन ये-जा करु नका बाबत समजविण्यासाठी गेलो असता त्याचा शिवाजी रामदास मनोरे यास राग आल्याने त्याने शिवाजी खडसे यांना शिवीगाळ करुन चापटा बुक््क्यांनी मारहाण केली होती. हि माहिती पुतण्या संदिप भागवत खडसे, उमेश रामधन खडसे व भाऊ भागवत भिका खडसे याना कळली .
यानंतर शिवाजी मनोरे याच्या घरी जाऊन त्यास समजविले असता शिवाजी मनोरे याचा मुलगा योगेश शिवाजी मनोरे याने घरातुन विळा आणुन विळ्याने पुतण्या संदिप ‘भगवत खडसे याच्या डाव्या हाताला मारला. यात तो गंभीर जखमी झाला . त्याला उपचारार्थ गोदावरी हॉस्पिटल, साकेगाव, येथे दाखल करण्यात आले आहे . याबाबत शिवाजी खडसे यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनला तक्रार दिली असून पुढील तपास पोलीस करीत आहे.