पाचोरा ;- जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना व्हायरस च्या उपाययोजनांबाबत आ. किशोर पाटील यांनी आज २० शनिवार रोजी दुपारी १ वाजता प्रांताधिकारी यांच्या कार्यालयात बैठक घेतली . यावेळी आ. किशोर पाटील यांनी शहरात सुरु असलेल्या उपाय योजनांची माहिती यावेळी पत्रकारांना देण्यात आली . पाचोरा आणि भडगाव तालुक्यात ३१ मार्चपर्यंत आठवडे बाजार बंद राहणार असून बाहेरगावाहून आणि परदेशातून येणाऱ्या नागरिकांची माहिती पोलीस स्टेशनला नोंद करण्याच्या सूचना यावेळी आ. किशोर पाटील यांनी दिल्या .