जळगाव ( प्रतिनिधी ) – गावठी बनावटीचे पिस्तूल घेवून फिरणाऱ्या तरूणाला शनीपेठ पोलीसांनी पाठलाग करून वाल्मिकनगरातून दुपारी अटक केली गावठी पिस्तूल हस्तगत केली आहे. शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राकेश उर्फ लिंबूराक्या चंद्रकांत साळुंखे (वय-२६ रा. कांचन नगर ) हा तरूण वाल्मिक नगरातील बगीचा परिसरात गावठी पिस्तूल घेवून दहशत माजवित असल्याची माहिती मिळाली. शनीपेठचे पोलीस निरीक्षक बळीराम हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकातील पोहेकॉ परिष जाधव, राहूल पाटील, प्रमोद पाटील, शरद पाटील यांनी दुपारी संशयित आरोपी लिंबूराक्याचा वाल्मिकनगर भागातील बगीचाजवळ पाठलाग करून अटक केली. त्यांच्या ताब्यातील चार हजार किंमतीचे गावठी पिस्तूल हस्तगत केले आहे. पुढील तपास पोहेकॉ परिष जाधव करीत आहे.