
रामानंद नगर पोलिसांत अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल
जळगाव(प्रतिनिधी) – जळगाव शहरातील गणपती नगर परिसरातून उभी असलेली हिरो स्प्लेंडर दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली. या प्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३ जुलै रोजी पहाटे ३ वाजेच्या सुमारास गणपती नगर परिसरातून हिरो स्प्लेंडर कंपनीची काळ्या रंगाची (एमएच-१८-सीए-८२३६) दुचाकी चोरीस गेली. चोरीस गेलेल्या दुचाकीची किंमत सुमारे ४० हजार रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
याप्रकरणी सचिन रावण पाटील (वय ३५, व्यवसाय – चालक, रा. हळसुने, ता. जि. धुळे) यांनी रामानंद नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) अन्वये अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार सुधाकर आंभोरे करीत आहेत.









