जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील अजिंठा चौफुलीवर गणपती घेण्यासाठी आलेल्या 40 वर्षे वयाच्या व्यक्तीच्या खिशातून अज्ञात चोरट्यांनी मोबाईल लांबवल्याचे उघडकीला आले इतर 3 जणांचेदेखील मोबाईल चोरीला गेल्याचे उघडकीला आले असल्याने एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रवीण दिपचंद पाटील (वय 40 रा. कुसुंबा रिक्षास्टॉप जवळ ) कुटुंबीयांसह राहतात. शुक्रवारी दुपारी कुटुंबीयांसह अजिंठा चौफुलीवर गणपती घेण्यासाठी आले होते. गणपती घेत असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या शर्टाच्या खिशातुन 5 हजार रुपये किमतीचा मोबाईल चोरून नेला. त्यांच्यासह इतर 3 जणांचे देखील 3 मोबाईल असे एकूण 20 हजार रुपये किमतीचे 4 मोबाईल लांबवले असल्याचे उघडकीला आले आहे.
प्रवीण पाटील यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास पो हेकॉ महेंद्रसिंग पाटील करीत आहे.







