जळगाव शहरातील व्यंकटेश नगरातील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील हरिविठ्ठल नगर परिसरातील व्यंकटेश नगरात एका १९ वर्षीय तरुणीने छताला गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी दि. १५ सप्टेंबर रोजी दुपारी दीड वाजता उघड झाली आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
महिमा नंदलाल सनान्से (वय १९, रा. व्यंकटेश नगर, हरिविठल परिसर, जळगाव) असे मयत तरुणीचे नाव आहे. ती आई, वडील, भाऊ, बहीण यांच्यासह राहत होती. महिमाचे वडील नंदलाल हे सलून व्यावसायिक असून त्यावरच उदरनिर्वाह करतात. (केसीएन) रविवारी दि. १५ सप्टेंबर रोजी दुपारी १ ते दीड वाजेच्या दरम्यान घरी कोणी नव्हते. महिमाची आई हि घरापुढील दुकानाजवळ बसलेली होती. काही वेळाने महिमाची आई हि घरात गेली असता तिला महिमा हि छताला गळफास लावून घेतलेल्या अवस्थेत दिसून आली. तिने एकच हंबरडा फोडला.
कुटुंबीयांनी महिमाला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. रेणुका भंगाळे यांनी तपासून मयत घोषित केले. यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला.(केसीएन)रामानंद नगर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, महिमा हि मनमिळावू स्वभावाची होती. तिच्या आत्महत्येमुळे कुटुंबाला मानसिक धक्का बसला असून व्यंकटेश नगरात शोककळा पसरली आहे.