जळगाव ;- तालुक्यातील भादली येथील ४५ वर्षीय व्यक्तीची मध्यरात्री राहत्या घरात दोरीने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना आज उघडकीला आली आहे.
किशोर रमेश नारखेडे (वय-४५) रा. भादली बु असे मयत व्यक्तीचे नाव आहे . ते आपल्या वृध्द आईसोबत राहतात.मध्यरात्री आई झोपेत असतांना किशोर नारखेडे यांनी राहत्या घरात दोरी गळफास घेवून आत्महत्या केली. नेहमीप्रमाणे त्यांची आई सकाळी उठल्यानंतर मुलाने गळफास घेतल्याचे उघड झाले. गावातील पोलीस पाटील ढाके यांनी तत्काळ नशिराबाद पोलीसांना घटनेची माहिती दिली. पोलीसांनी मृतदेहाचा पंचनामा करून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृतदेह आणण्यात आला. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. पुढील तपास नशिराबाद पोलीस कर्मचारी करीत आहे.