जळगाव;- लग्नासाठी कुटुंब बाहेरगावी गेल्याने हि संधी साधत चोरटयांनी सुमारे दोन लाखांचा ऐवज चोरून नेल्याची घटना आज उघडकीस आली असून यामुळे खळबळ उडाली आहे.

शहरातील ईच्छादेवी चौकाजवळी फुकटपुर्यातील फरजाना बी आसीफ खान या आपल्या कुटुंबियांसोबत वास्तव्यास आहेत. . फरजाना बी यांच्या नातेवाईकांकडे आज लग्न असल्याने ते शनिवारी रात्री सहकुटुंब पाचोरा येथे लग्नासाठी गेले होते.
चोरट्यांनी ४० हजार रुपये किंमतीचे कानातील रिंग, १५ हजारांची सोन्याची पोत, ९ हजारांची सोन्याची अंगठी, ३६ हजारांचे सोन्याचे मंगळसूत्र, १ हजार ५०० रुपयांची लहानमुलाची अंगठी, ३ हजारांचे बाळाचे दागिने, १२ हजारांचे पायातील फुलतोडे, ३०० रुपयांची चांदीची चैन, ४ हजार ५०० रुपयांचे हातातील कडे व ७२ हजार रुपये रोख असा एकूण १ लाख ९३ हजारांचा मुद्देमाल चोरट्यांने लंपास केला. चोरी केल्यानंतर चोरट्यांनी किरणा दुकानातील सामानाची नासधूस केली होती. याप्रकरणीएमआयडीसी पोलिसात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.






