जळगाव (प्रतिनिधी) : महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमीत्त फुले मार्केट येथे आ. सुरेश भोळे यांचे हस्ते महात्मा फुले यांच्या पुतळ्याला माल्यार्पण व पूजन करण्यात आले. यावेळी विविध मान्यवरांची उपस्थिती होती.
क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले उत्सव समितीतर्फे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यात महात्मा फुले मार्केट येथे आ. भोळे यांनी पुतळ्याला माल्यार्पण करून पूजन करीत अभिवादन केले. आ. सुरेश भोळे यांनी महात्मा फुले यांच्या समाज प्रबोधनपर कार्याविषयी माहिती दिली. यानंतर उन्हाळ्यानिमित्त पक्ष्यांसाठी मोफत परळ वाटप करण्यात आले.
यावेळी उद्योजक संतोष इंगळे, मुरलीधर महाजन, सरीता माळी कोल्हे, मंगलाताई बारी, वसंत पाटील, नंदू पाटील, प्रशांत महाजन, हर्षल इंगळे, हेमंत महाजन, रामू सैनी, कैलास सैनी, दिलीप माळी, निवेदिता ताठे, भारती काळे तसेच जळगाव शहरातील नागरिक उपस्थित होते.
अयोध्या नगर
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमीत्त अयोध्या नगर येथे महात्मा फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व पूजन करण्यात आले. यावेळी विविध मान्यवरांची उपस्थिती होती. महात्मा फुले बहुउद्देशिय विकास समाज संस्थातर्फे महात्मा फुले यांच्या कार्याला उजाळा देण्यात आला. यावेळी माजी नगरसेविका रंजनाताई वानखेडे , विजय वानखेडे, संतोष इंगळे, सुभाष माळी, वसंत महाजन, प्रशांत महाजन, नंदू पाटील, तुळशीराम वारुळे, वामन महाजन, सुनिल चौधरी, प्रवीण चौधरी, दिलीप बागुल, हेमंत महाजन, हर्शल इंगळे, राजू तायडे, प्रभाकर महाजन तसेच जळगाव शहरातील नागरिक उपस्थित होते.