• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

परवानगी नसताना महाराष्ट्रात खत विक्री; गुजरातच्या कंपनीविरोधात गुन्हा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 25, 2026
in Uncategorized
0
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास

परवानगी नसताना महाराष्ट्रात खत विक्री; गुजरातच्या कंपनीविरोधात गुन्हा

जळगाव | प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्यात खत विक्रीची परवानगी नसतानाही गुजरातमधील कंपनीकडून खतांची विक्री करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात संबंधित कंपनीचे प्रतिनिधी व जबाबदार व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

१८ हजार रुपयांची फसवणूक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुजरातमधील भरुच जिल्ह्यातील पानोली येथील सिडनी फॉर्म्युलेशन अँड केमिकल्स या कंपनीकडून महाराष्ट्रात खत उत्पादन व विक्रीसाठी आवश्यक परवानगी नसतानाही व्यवहार करण्यात आल्याचा आरोप आहे. या माध्यमातून १८ हजार २० रुपयांची रक्कम यूपीआयद्वारे स्वीकारण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे.

M-Form व बिलांबाबतही नियमांचे उल्लंघन

कंपनीने विहित नमुन्यातील M-Form मध्ये खत विक्रीचे बिल दिले नसल्याचे तसेच महाराष्ट्रातील खत विक्री व किरकोळ विक्रीसाठी आवश्यक परवाना नसतानाही विक्री केल्याचा आरोप आहे. कीटकनाशक विक्रीसाठीही आवश्यक नमुन्यात बिल न देता नियमबाह्य व्यवहार करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे.

WhatsApp, QR कोडद्वारे व्यवहार

कंपनीकडून WhatsApp, QR Code आणि ट्रान्सपोर्टच्या माध्यमातून महाराष्ट्रात नियमबाह्य थेट व्यावसायिक विक्री करण्यात आल्याचे तपासात समोर आल्याचा दावा करण्यात आला आहे. या व्यवहारामुळे शेतकऱ्यांची दिशाभूल व फसवणूक झाल्याचेही तक्रारीत नमूद आहे.

कंपनीच्या जबाबदार व्यक्तीविरोधात गुन्हा

कंपनीचे जबाबदार व्यक्ती विनोद एन. रणपरीया यांनी २० ऑगस्ट रोजी दिलेल्या खुलाशात गुजरात राज्यातील कीटकनाशक उत्पादक परवाना कंपनीकडे असल्याचे नमूद केले. मात्र महाराष्ट्र राज्यातील कीटकनाशक किरकोळ व विक्री परवाना तसेच खत परवाना नसल्याचे खुलाशातून स्पष्ट झाल्याचे तक्रारीत नमूद आहे.

या प्रकरणी खत नियंत्रण आदेश १९८५, अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५, कीटकनाशक अधिनियम १९६८ व संबंधित नियम, तसेच भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३१८(४) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अशोक काळे करीत आहेत.

Previous Post

घरातील लोखंडी पाइपला गळफास घेत २८ वर्षीय तरुणाचा मृत्यू

Next Post

केवायसी’च्या नावाखाली वकिलाची ९७ हजारांची ऑनलाइन फसवणूक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
करारनामा केला, मात्र पैसे न देताच ११ लाख ५० हजारांचा ट्र्क घेऊन गेले !

केवायसी’च्या नावाखाली वकिलाची ९७ हजारांची ऑनलाइन फसवणूक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात ऑटोमोबाईल व इलेक्ट्रिक व्हेईकल तंत्रज्ञानावर तज्ज्ञ व्याख्यान
खान्देश

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये संशोधन लेखन व प्रकाशनावर मार्गदर्शन

October 14, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात ऑटोमोबाईल व इलेक्ट्रिक व्हेईकल तंत्रज्ञानावर तज्ज्ञ व्याख्यान
खान्देश

डॉ. केतकी पाटील कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये जागतिक मानसिक आरोग्य दिन साजरा

गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेच्या प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख, तर जिल्हा उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर पाटील यांची निवड
खान्देश

गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेच्या प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख, तर जिल्हा उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर पाटील यांची निवड

October 14, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात ऑटोमोबाईल व इलेक्ट्रिक व्हेईकल तंत्रज्ञानावर तज्ज्ञ व्याख्यान

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये संशोधन लेखन व प्रकाशनावर मार्गदर्शन

October 14, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात ऑटोमोबाईल व इलेक्ट्रिक व्हेईकल तंत्रज्ञानावर तज्ज्ञ व्याख्यान

डॉ. केतकी पाटील कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये जागतिक मानसिक आरोग्य दिन साजरा

October 14, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!