चाळीसगाव तालुक्यातील घटना
जळगाव (प्रतिनिधी ) ;- शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतविल्यास अधिक नफा मिळण्याचे अमिश दाखवून चाळीसगाव तालुक्यातील २० वर्षीय उच्चशिक्षित तरुणीला २१ लाख ७ हजार ४५६ रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी जळगावच्या सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि , चाळीसगाव तालुक्यातील वर्षीय उच्चशिक्षित तरुणीला १७ मे २०२४ ते ७ जुलै २०२४ दरम्यान साक्षी सिंग नावाच्या महिलेने टेलिग्राम अकाउंटवर इंडस्टोक नावाने लिंक पाठवून यांच्या व्हॅट्सऍपवर मोतीलाल ओसवाल ग्रुप क्यू ५ या ग्रुपला जॉईन करून व्हाट्सपच्या मोबाईल क्रमांक वरून बँक खात्याची माहिती पाठविण्यात आली . तसेचच यात शेअर मार्केटमध्ये पैसा गुंतविल्यास अधिक नफा होईल असे आमिष दाखविण्यात आले.
त्यानुसार यांच्याकडून वेळोवेळी ऑनलाईन २१ लाख ७ हजार ४५६ रुपये स्वीकारून आर्थिक फसवणूक करण्यात आली. याबाबत जळगावच्या सायबर पोलीस ठाण्यात साक्षी सिंग आणि इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक एमएम कासार करीत आहे.