पुष्पवृष्टी उधळत टाळया वाजवून स्वागत

जळगाव;- येथील डॉ उल्हास पाटील महाविद्यालय व रूग्णालयातील तरूणाने आज कोरोनावर केली असून त्याचे जोरदार स्वागत करण्यात आले.
सदर तरूणाचे रूग्णवाहीकेने डॉ उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालयात आगमन झाले. या तरूणाने धाडस दाखवत कोरोनावर मात केली आहे. सामान्य रूग्णालयातून आज त्याची सूटी करण्यात आली.डॉ उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालय परीसरात या तरूणाचे स्वागत पुष्पवृष्टी उधळत व टाळया वाजून करण्यात आले. या तरूणाने सर्वांचे आभार मानत परिसरातील सर्वांनी मनोबल वाढवल्यामूळे या आजारावर मात करू शकलो असे सांगीतले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष माजी खा. डॉ उल्हास पाटील, अधिष्टाता डॉ. एन एस आर्विकर, हदयालय विभागाचे हदयरोग तज्ञ डॉ वैभव पाटील, प्रशासकीय अधिकारी प्रमोद भिरूड, रूग्णालय व्यवस्थापक आशिष भिरूड, गोदावरी नर्सिंगचे प्रशासकीय अधिकारी प्रविण कोल्हे,मेट्रन प्रा संकेत पाटील, प्रा शिवा बिरादर, बांधकाम विभाग प्रमुख संजय भिरूड, गोदावरी अभियांत्रिकीचे प्रमुख प्रा एन जी चौधरी, हॉस्टेल रेक्टर प्रा. सुरेंद्र गावंडे इ सह वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालयाचे विदयार्थी उपस्थीत होते.
कोरोना वारीयर्सचे धाडस कौतुकास्पद — माजी खा. डॉ उल्हास पाटील
हया तरूण कोरोना वारियर्सने जिदद व धाडस दाखवत उपचार पुर्ण करून कोरोनावर मात केली पुढील उपचारासंदर्भात विचारपूस करून काळजी घेण्याचे सांगून हे कौतुकास्पद असून त्याची जिदद व धाडस इतरासाठी प्रेरणादायक असल्याचे सांगीतले.







