जामनेर;- तालुक्यातील महिला शिक्षिकांनी यांनी हळदी कुंकू या कार्यक्रमाचे आयोजन केले. सदर कार्यक्रमात महिलांना त्यांच्या कला गुणांना वाव मिळावा रोजच्या दगदगीतून थोडासा आराम आणि मनोरंजन व्हावे म्हणून विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते ही संकल्पना सर्व महिला शिक्षिकानी मांडली.
हळदी .कुंकूकार्यक्रमाचे अध्यक्षस्थान गारखेडा शाळेच्या मुख्याध्यापिका छाया सुर्यवंशी यांनी स्विकारले. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून मनिषा अनिल गायकवाड या उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरूवात प्रतिमा पुजनाने झाली. यानंतर कु. हिमानी ज्ञानेश्वर चौधरी हिने गणेश वंदना म्हणून नृत्य सादर केले.
या हळदी कुंकू च्या कार्यक्रमात ज्या विविध स्पर्धा घेण्यात आल्या, जसे की संगीत खुर्ची, सुई दोरा, पेपर डान्स, दम शरारत या सर्व स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडल्या. हळदी कुंकूचे वान ही थीम वापरून मंगल म्हेत्रे व ज्योती उंबरकर यांनी अप्रतिम अशी रांगोळी काढली. तसेच सुंदर हस्ताक्षरात उत्कृष्ट असे फलकलेखन सुनंदा नेमाडे यांनी केले. म्हेत्रे मँडमांनी उत्कृष्ट तयार केलेला सेल्फी पाँईट हा कार्यक्रमात खुपच आकर्षक ठरला.
तसेच स्पर्धांमध्ये उत्स्फूर्तपणे महिलांनी सहभाग नोंदविला. संगीत खुर्चीमध्ये प्रथम क्रमांक दिपाली पंडित मँडम, द्वितीय क्रमांक वर्षा पाटील मँडम, तृतीय क्रमांक छाया सुर्यवंशी मँडम असे अनुक्रमे तीन नंबर काढण्यात आले. सुई दोरा स्पर्धेत प्रथम क्रमांक प्रिया परदेशी मँडम द्वितीय क्रमांक वंदना पोळ मँडम तृतीय क्रमांक मनिषा गायकवाड मँडम असे नंबर काढण्यात आले.
पेपर डान्स स्पर्धेत जोडी डान्स मध्ये प्रथम क्रमांक पुष्पा पाटील मँडम व माधवी गैलवार मँडम आणि द्वितीय क्रमांक मंगल म्हेत्रे मँडम व ज्योती उंबरकर मँडम यांचा आला.
दम शरारत या स्पर्धेत सहा गट करून मुक अभिनय हा खेळ घेतला व यात गट क्रमांक ६ हा विजेता ठरला.
या कार्यक्रमात पुष्पा पाटील मँडम, माधवी गैलवार मँडम, ज्योती उंबरकर मँडम व मनिषा ठाकुर मँडम यांनी सामुहिक नृत्य सादर केले. यानंतर विजेत्या स्पर्धकांना बक्षीस वितरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कविता चौधरी, मंगल म्हेत्रे, ज्योती उंबरकर, सुनंदा नेमाडे, सविता बारी व माया शेळके यांनी मेहनत घेतली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंगल म्हेत्रे मँडम व ज्योती उंबरकर मँडम यांनी केले. तर आभार कविता चौधरी मँडम यांनी मानले.
अशाप्रकारे हा हळदी कुंकू समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला.








