जळगाव ;- सध्या राज्यासह देशात कोरोना आजारग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत असून त्या पार्शवभूमीवर आज सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे ,माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी जिल्हा रुग्णालयात स्थापन करण्यात आलेल्या कोरोना आयसोलेशन कक्षाची पाहणी रुग्णांना योग्य ते उपचार मिळतील याची काळजी घेऊन वैद्यकीय अधिकार्याना योग्य त्या सूचना केल्या . यावेळी , अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे , उप अधिष्ठाता डॉ. किरण पाटील आदी यावेळी उपस्थित होते .
करोना संदर्भातील आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास आपल्याला काय उपाययोजना असू शकतात या संदर्भात आढावा आमदार गिरीश महाजन व जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे डिन भास्कर खैरे यांनी आज वैद्यकीय महाविद्यालय येथे येऊन घेतला . यावेळी आपत्कालीन परिस्थितीमध्ये 20 बेडचे इसोलेशन वॉर्ड तयार करण्यात आलेला असून या वार्ड मध्ये वा तात्काळ व्हेंटिलेटर ची व्यवस्था व्यवस्था उपलब्ध करून देण्याबाबत सुचना आमदार गिरीश महाजन यांनी दिल्या . या करिता आवश्यक ती आर्थिक मदत स्वतःहुन देण्याची तयारी दाखवली. तसेच रोटरी गोड कल्ब अध्यक्ष नंदू आडवखनी यांना या आपत्कालीन परिस्थितीमध्ये सी एस आर च्या माध्यमातून मदत करण्याचे आवाहन केले. जिल्हाभरात आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास काय उपाययोजना करण्यात येईल याची चर्चा यावेळी झाली.
या यावेळी वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टर भास्कर खैरे यांनी सांगितले कि वैद्यकीय महाविद्यालयात करोना तपासणी वार्ड सुरू करण्यात आलेला आहे. 20 खाटाचा स्वतंत्र अध्यावत असा वार्ड तयार करण्यात आला असून त्या ठिकाणी आज एक करूनच संशयित रुग्ण दाखल करून घेण्यात आलेला आहे. त्याच बरोबर जिल्ह्यातील येणाऱ्या रुग्नासाठी स्वतंत्र बाह्य रुग्ण विभाग स्वतंत्रपणे सुरू करण्यात आला असून त्याठिकाणी आज जवळजवळ दोनशे रुग्णांची तपासणी करण्यात आलेली आहे . त्याचबरोबर येणाऱ्या करोना रुग्णांची काळजी घेण्यासाठी या ठिकाणी उपलब्ध असलेल्या सर्व जूनियर्स डॉक्टर्सना ट्रेनिंग देण्यात आलेला आहे . त्यांना ट्रीटमेंट प्रोटोकॉल समजावून सांगण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर डॉक्टर आणि स्वतःची काळजी कशी घ्यायची याबाबतीत त्यांना माहिती देण्यात आली आहे.