शहरातील संतापजनक घटना; नराधम आरोपी गजाआड
फैजपूर (प्रतिनिधी):- शहरातील एका भागात ७५ वर्षीय वृद्ध महिलेच्या एकटेपणाचा फायदा घेऊन तिच्यावर अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी फैजपूर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत संशयित नराधमाला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २९ जून रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास पीडित वृद्ध महिला तिच्या घरात भुईमुगाच्या शेंगा फोडत बसलेली होती. यावेळी संशयित आरोपी रवींद्र उर्फ रवी रमेश चव्हाण (वय ४४, रा. फैजपूर) हा पाणी पिण्याच्या बहाण्याने घरात शिरला. त्याने वृद्धेचे दोन्ही हात पकडून तिला स्वयंपाकघरात ओढत नेले आणि बळजबरीने अत्याचार केला. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ६४(१), ७४, ७६ आणि ३५१(२) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.









