मुंबई (वृत्तसंस्था) – राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांनीही नोटाबंदीच्या काळात बनावट नोटांची हेराफेरी केल्याचा आरोप केला आहे. मलिक यांनी भाजप नेते आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.

फडणवीस यांच्या सत्ता काळात बनावट नोटांचे जाळे पसरले गेले. हे जाळे थेट दाऊदपर्यंत पोहोचले होते. देशात नोटा जप्त केल्या गेल्यात. नोटबंदीत एका वर्षात राज्यात बनावट नोटांचे जाळे पसरले होते. देशात नोटा जप्त केल्या जात होत्या. मात्र, राज्यात कारवाई केली गेली नाही. बनावट नोटांचे प्रकरण दाबले गेले. बनावट नोटांचे जाळे दाऊदपर्यंत आहे, असा गंभीर आरोप मलिक यांनी फडणवीस यांच्यावर केला.
नवाब मलिक यांनीही नोटाबंदीच्या काळात बनावट नोटांची हेराफेरी होत होती आणि देवेंद्रजींनी अशा प्रकरणांवर पांघरूण घालण्याचे काम केले आहे. नवाब मलिक म्हणाले, ‘देशात पाच वर्षांपूर्वी 8 नोव्हेंबर रोजी नोटाबंदी झाली आणि देशभरात बनावट नोटा पकडल्या जाऊ लागल्या, पण महाराष्ट्रात वर्षभरात बनावट नोटांची एकही घटना समोर आली नाही, कारण बनावट नोटा प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांच्या संरक्षणाखाली काम सुरू होते. 8 ऑक्टोबर 2017 रोजी 14 कोटी 56 लाखांच्या बनावट नोटा पकडल्या गेल्या होत्या, मात्र देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणावरून हात झटकला. बनावट नोटा चालवणाऱ्यांना तत्कालीन सरकारचे संरक्षण होते, असा आरोप मलिक यांनी केला.
दरम्यान, एनसीबीमध्ये कोट्यवधीची वसुली सुरू आहे. तो विषय मी समोर आणला त्यापासून लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी हे काम सुरु आहे. कारण तो अधिकारी फडणवीस यांच्या जवळचा आहे, त्याला वाचवायचे आहे, असा आरोप मलिक यांनी फडणवीस यांच्यावर केला.
आपण (देवेंद्र फडणवीस) मुख्यमंत्री असताना आपण अंडरवर्ल्डशी संबंधित गुंडांना सरकारी महामंडळाचे अध्यक्ष बनवले. नागपूरचा मुन्ना यादव याच्यावर खंडणी, खुनाचे गुन्हे आहेत, तो फडणवीस यांचा साथीदार आहे. त्याला महामंडळाचे अध्यक्ष केले होते. हैदर आझम याला मौलाना आझाद महामंडळाचे अध्यक्ष केले होते. तो बंग्लादेशातील नागरिकांना मुंबईत वसवण्याचे काम करतो. त्याची दुसरी बायको बांग्लादेशी आहे, असा घणाघात मलिक यांनी फडणवीस यांच्यावर केला.







