जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या आवारात सुप्रीम इंडस्ट्रीज व एच डी फायर प्रोटेक्ट यांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून उभारलेल्या बहुउद्देशीय सभागृहाचे उदघाटन आज करण्यात आले.
पोलीस अधीक्षक डॉ प्रविण मुंढे यांच्या हस्ते व अपर पोलीस अधीक्षक चद्रकांत गवळी, सहायक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा, सुप्रीम कंपनीचे मुख्य व्यवस्थापक संजय प्रभुदेसाई, एच डी फायर प्रोटेक्ट कंपनीचे संचालक मिहीर घोटीकर यांचे प्रमुख उपस्थीतीत कोनशिला अनावरण व बहुउद्देशीय सभागृहाचे फित कापुन उद्घाटन करण्यात आले.
याप्रसंगी कोरोना काळामध्ये उत्कृष्ट कामगीरी बजावलेल्या पोलीस पाटलांचा मान्यवरांचे हस्ते प्रशस्तीपत्र देवुन कोरोना योध्दे म्हणुन सन्मान करण्यात आला. सहायक फौजदार तुकाराम निंबाळकर, प्रचीती मिडीयाचे सचीन घुगे यांचाही सन्मान करण्यात आला. सुप्रीम इंडस्ट्रीजचे जनरल मॅनेजर जी के सक्सेना, एच डी फायरचे जनरल मॅनेजर सुधीर पाटील, लघुउदयोग भारतीचे प्रमुख समीर साने, पोलीस पाटील, पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार उपस्थीत होते.
एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पो नि प्रताप शिकारे यांनी कार्यक्रमाचे आयोजन व प्रास्तावीक केले पोलीस बिनतारी संदेश विभागाचे अमित माळी यांनी सुत्रसंचालन केले. सपोनी प्रमोद कठोरे यांनी आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी सपोनि अमोल मोरे, पोउनी अनिस शेख, दिपक जगदाळे, रविंद्र गिरासे, निलेश गोसावी, स फौ अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, विश्वास बोरसे, शिवदास नाईक, दिपक चौधरी, सचीन पाटील, योगेश बारी, सपना येरगुंटला यांचे विशेष सहकार्य लाभले. कोरोना नियमांचे पालन करुन हा सोहळा संपन्न झाला.