जिल्ह्यात सहा नगरपरिषदांमधील १२ प्रभागातील जागांच्या निवडणुका पुढे ढकलल्या

जळगाव प्रतिनिधी जिल्ह्यात नगरपालिकेची रणधुमाळी सुरू असताना निवडणूक आयोगाच्या नवीन आदेशाने जिल्ह्यात सहा नगरपरिषदांमधील १२ जागाच्या निवडणुका पुढे ढकलल्या आहेत. यात अमळनेर, सावदा, यावल, वरणगाव, पाचोरा व भुसावळ येथील जागांचा समावेश आहे.
या प्रभागांमध्ये आता २० डिसेंबर रोजी निवडणूक तर २१ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या आदेशात म्हटले आहे. निवडणूक पुढे ढकललेल्यामध्ये अमळनेर नगरपरिषदेत प्रभाग १ अ, सावदा नगरपरिषेदत प्रभाग
२ ब, प्रभाग ४ ब, व प्रभाग १० ब, यावल नगरपरिषदेत प्रभाग ८ ब, वरणगाव नगरपरिषेदत प्रभाग १० अव १० क, पाचोरा नगरपरिषदेत प्रभाग ११ अव प्रभाग १२ ब यांचा समावेश आहे. भुसावळ नगरपरिषदेत प्रभाग ४ ह्यबह्न, प्रभाग ५ ह्यबह्न आणि प्रभाग ११ ब या तीन प्रभागांच्या निवडणूक प्रक्रिया राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार पुढे ढकलण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील १२ प्रभागातील निवडणूक लाबली असली तरी अन्य प्रभागात ठरल्याप्रमाणे २ डिसेंबर रोजी निवडणूक होणार आहे. तेथे तीन रोजी मतमोजणी होणार आहे
नामनिर्देशन दाखल करतानाउमेदवारांनी दाखल केलेल्या हरकती फेटाळल्यानंतर काही उमेदवारांनी न्यायालयात अपील दाखल केले होते. मात्र, २२ नोव्हेंबरपर्यंत निकाल अपेक्षित असताना हा निकाल २५ नंतर आल्यानंतर उमेदवारांना माघारीसाठी अपेक्षित वेळ मिळाला नाही व चिन्ह वाटपाची ही प्रक्रिया उरकली गेल्यानेअशा ठिकाणीसाठी आता सुधारित निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला असे असले तरीही या प्रभागांमध्ये नव्याने कोणालाही नामांकन दाखल करता येणार नाही. भुसावळ येथे याबाबतचे आदेश निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील यांनी दिले आहेत









