जळगाव एलसीबीकडून कारवाई, सुरत येथून होता फरार
जळगाव (प्रतिनिधी) : नुकताच दोन आठवडयापुर्वी सुरत शहरात १९८ ग्रॅम एम्फेटामाईन सदृश अंमली पदार्थ सुरत पोलीसाकडुन पकडण्यात आला होता. त्यात जळगाव शहरातील इसम नामे नाझीम रशीद कुरेशी (रा. मास्टर कॉलनी, जळगाव) हा फरार होता. त्याचा शोध घेणेकामी सुरत पोलीस जळगाव जिल्हयात येऊन गेले होते. परंतु त्यांना नाजीम कुरेशी मिळुन आला नव्हता. त्यास स्थानीक गुन्हे शाखा जळगावच्या पथकाने दिं. २० रोजी ताब्यात घेऊन सुरत सिटी पोलीस स्टेशन (क्राईम ब्रँच सुरत सिटी) यांच्या ताब्यात दिले आहे. त्याबद्दल सुरत सिटी क्राइम ब्रँच च्या वतीने स्थानिक गुन्हे शाखा जळगावच्या पथकाचे आभार व्यक्त करण्यात आले आहे.
नागरिकांना जळगाव पोलीस दलाकडुन अहवान करण्यात येते की, कोणत्याही प्रकारची अंमली पदार्थ विक्रीबाबत आपणास माहीती प्राप्त झाल्यास तात्काळ नजिकच्या पोलीस ठाण्यास किंवा टोल फ्री क्रंमाक ११२ वर संपर्क साधावा. आपले नाव व ओळख कोठेही उघड करण्यात येणार नाही. सदरची कारवाई डॉ. महेश्वर रेड्डी सो. पोलीस अधिक्षक, अशोक नखाते, अपर पोलीस अधिक्षक, नितीन गणापुरे यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली राहुल गायकवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, निरीक्षक बबन आव्हाड, सपोनि गणेश वाघ, पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, सफौ/अतुल वंजारी, पोहवा/अकरम शेख, विजय पाटील, प्रविण भालेराव, सलीम तडवी, पोना/ किशोर पाटील, पोशि/गोपाल पाटील, रविंद्र कापडणे, सिध्देश्वर डापकर, रविंद्र चौधरी चापोशि महेश सोमवंशी यांच्या पथकाने केली आहे.