जळगावातील गुन्हेगारी “ऑनड्युटी”
जळगाव (प्रतिनिधी) : शहरात दुचाकी चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. दररोज दुचाकी चोरीच्या नोंदी पोलीस स्टेशनमध्ये नोंद होऊ लागलेल्या आहेत. जळगावात आणखी दोन दुचाकी चोरीची नोंद झालेली आहे. दोन्ही घटनेप्रकरणी जिल्हापेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आयएमआर महाविद्यालयासमोर प्रोफेसर कॉलनीत बंगल्यासमोर मंडपात लावलेली सुमारे ३० हजार रुपये किमतीची होंडा शाईन दुचाकी चोरट्यांनी लांबविली. दि. २८ जून रोजी रात्री ही घटना घडली. या प्रकरणी शुक्रवार दि. १२ रोजी रमेश गणपत सपकाळ (वय ५८ रा. ड्रिम बंगला प्रोफेसर कॉलनी) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. या प्रकरणी गुन्हयाचा तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल महेंद्र पाटील हे करीत आहेत.
दुसऱ्या घटनेत नवीन बस स्थानकाच्या आऊट गेटच्या बाजुला पार्किंगमधून दुचाकी लांबविली. मंगळवार दि. ९रोजी सकाळी ही घटना घडली. हिमांशु संजय भाटीया ( वय २६,रा. राधाकृष्ण नगर शिवाजीनगर) हे मंगळवारी त्यांच्या मालकीची दुचाकी हिरो स्प्लेंडर ( क्रमांक एमएच १९ डिएफ २५०८) ने बसस्थानक परिसरात आले होते. त्यांनी दुचाकी बसस्थानकाच्या गेटजवळील जल मंदिरालगत पार्किंगमध्ये लावली. त्यानंतर ते कामाला गेले. ही संधी साधत चोरट्यांनी दुचाकी लांबविली. या प्रकरणी शुक्रवार दि. १२ रोजी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. तपास पोलीस हेड कॉन्सटेबल सलीम तडवी हे करीत आहेत.