जळगाव शहरातील दुपारची घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- शहरातील औद्योगिक वसाहत परिसरात काशिनाथ लॉजजवळ भरधाव दुचाकी आणि रिक्षाच्या धडकेत तरुण ठार झाल्याची घटना सोमवारी दि. ३० सप्टेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.
विजय मगन पाटील (वय ४०, रा. कौतिक नगर, अयोध्या नगर परिसर, जळगाव) असे मयत इसमाचे नाव आहे. ते भाऊ, वडिलांसह राहत होते. एमआयडीसी परिसरातील गुरांच्या बाजार परिसरात विजय पाटील हे पानटपरी चालवून उदरनिर्वाह करीत होते. (केसीएन)सोमवारी विजय पाटील हे उत्पन्न बाजार समितीजवळ जात असताना काशिनाथ लॉज जवळ एका रिक्षाला त्यांच्या दुचाकीची जबर धडक बसली.
त्यात गंभीर जखमी झालेल्या विजय पाटील यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नागरिकांनी दाखल केले. तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. निरंजन देशमुख यांनी तपासून विजय पाटील यांना मयत घोषित केले.(केसीएन)यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. एमआयडीसी पोलीस स्टेशनला माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला नोंद करण्याचे काम सुरु होते.