जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील रेल्वे मालधक्का येथून हमाली काम करणाऱ्या तरूणाची तीस हजार रूपये किंमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरली आहे. याप्रकरणी बुधवार २२ जून रोजी दुपारी २ वाजता शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, करण शिवप्रसाद ओसवाल (वय – ३८) रा. भूरे मामलेदार, शिवाजी नगर,जळगाव हा तरूण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. रेल्वे मालधक्क्यावर हमालीचे काम करून तो आपला उदरनिर्वाह करतो. सोमवारी २० जून रोजी दुपारी २ वाजता करण ओसवाल हा (एमपी ४७ एमएल ३१५०) दुचाकीने रेल्वे मालधक्कावर आला. मालधक्क्याच्या शेडजवळ दुचाकी पार्क करून माला निघून गेला. अज्ञात चोरट्यांनी ३० हजार रूपेय किंमतीची दुचाकी चोरून नेली. सायंकाळी ६ वाजता दुचाकीजवळ करण आला असता त्याला दुचाकी दिसून आली नाही. त्याने दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला परंतू दुचाकी आढळून न आल्याने बुधवारी २२ जून रोजी दुपारी २ वाता शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक योगेश पाटील करीत आहे.