जळगाव ;शहरात दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले असून रेल्वे स्थानकाजवळून २० हजार रुपये किंमतीची दुचाकी लंपास झाल्याची घटना उघडकीस आली असून चोरट्यांचा पोलिसांनी बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.
अयोध्यानगर परिसरात राहणारे दिनेश अशोक जैसवाल (वय-३१) हे कामाच्या निमित्ताने शनिवारी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास जळगाव रेल्वे स्थानकावर आले होते. त्यावेळी त्यांनी दुचाकी जळगाव रेल्वे स्थानकासमोर लावून कामानिमित्त निघून गेले. काम आटोपून रात्री ११ वाजता दुचाकीजवळ आले असता दुचाकी जागेवर मिळून आली नाही. परिसरात शोध करून दुचाकी मिळून न आल्याने त्यांनी शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली. दिनेश जैसवाल यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनि चंद्रकांत पाटील करीत आहे.