जळगाव ( प्रतिनिधी ) – बौद्धिक संपदा हक्क आणि नवप्रवर्तन २५ या विषयावर आयपीआर सेल, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांनी आयोजित केलेल्या एकदिवसीय आंतरमहाविद्यालयीन मूट कोर्ट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. गोदावरी फाउंडेशन संचालित डॉ. उल्हास पाटील लॉ कॉलेज, जळगाव उल्लेखनीय कामगिरी करत विजेतेपद पटकावले आहे.
विजयी संघात प्रियांका दिलीप कासार, आनंदा गोंटू पाटील आणि तेजस शिरसाठ यांचा समावेश होता. टीमने कायदा, न्यायशास्त्र आणि प्रभावी मूटिंग स्किल्स यांच्या बळावर निर्णायक पातळीवर उत्कृष्ट कामगिरी सादर केली.विजयाबरोबरच या टीमने पुढील पायरीवर कवित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्रतिनिधित्व दिल्ली येथे करण्याचा मानही मिळवला आहे. या साठी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर नयना महाजन, डॉ.ललिता सपकाळे , डॉ.नदीम शेख यांचे मार्गदर्शन लाभले.संस्थेचे चेअरमन डॉ.उल्हास पाटील सेक्रेटरी डॉ.वर्षा पाटील यांनी विजेत्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले. पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात दिल्ली येथे होणार्या ‘राष्टीय बौद्धिक संपदा आणि नवसंशोधन धोरण’ स्पर्धेत सदर संघ विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करणार आहे.