विविध स्पर्धांतील विजेत्यांचा गौरव,प्रसार प्रचाराचा निर्धार
जळगाव ( प्रतिनिधी ) – येथील डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेदिक महाविद्यालयात प्राचीन भारतीय ज्ञानपरंपरेचा वारसा जपणे आणि आयुर्वेदातील मूळ संस्कृत ग्रंथांचा परिचय विद्यार्थ्यांना करून देणे, प्रसार व प्रचाराच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या ‘संस्कृत सप्ताहाचा’ ५ सप्टेंबर रोजी समारोप सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.



सप्ताहभराच्या या आयोजनात विद्यार्थ्यांच्या बौद्धिक व कलागुणांना वाव देण्यासाठी अनेक स्पर्धा व उपक्रम राबवण्यात आले. यामध्ये संस्कृत संभाषण कार्यशाळा, श्लोक पठण स्पर्धा, प्रश्नमंजुषा, वक्तृत्व स्पर्धा यांसारख्या विविध शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रमांचा समावेश होता. या सर्व स्पर्धांमध्ये महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे भाग घेतला.यावेळी कार्यक्रमाच्या व्यासपीठावर गोदावरी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील,सदस्य हदयरोग तज्ञ डॉ. वैभव पाटील,डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रशांत सोळंके,आयुर्वेद महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. हर्षल बोरोले, डॉ. उल्हास पाटील होमीओपॅथी महाविद्यालयाचे प्रिन्सीपल डॉ. शिवानंद आठवले यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, वैद्यकीय अधिकारी, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना मान्यवरांनी संस्कृत ही केवळ एक भाषा नसून भारतीय ज्ञानपरंपरा आणि वैद्यकशास्त्राचा समृद्ध पाया आहे, असे प्रतिपादन केले. यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, वैद्यकीय अधिकारी, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाच्या शेवटी सप्ताहभरात झालेल्या विविध स्पर्धांतील विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.









