• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

सिंचन क्षेत्रातील दूरदृष्टी असलेले नेते म्हणजे अजितदादा! – अशोक जैन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 25, 2026
in खान्देश, जळगाव, जैन कंपनी, नवी दिल्ली, भारत, महाराष्ट्र, मुंबई
0
सिंचन क्षेत्रातील दूरदृष्टी असलेले नेते म्हणजे अजितदादा! – अशोक जैन

जळगाव ( प्रतिनिधी ) – जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आवारात महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते अजितदादा पवार यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे, तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तैलचित्राचे लोकार्पण करण्यात आले. यानिमित्ताने छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात आयोजित कार्यक्रमात जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी अजितदादांच्या कार्याच्या आठवणींना उजाळा दिला.


अशोक जैन म्हणाले, “महाराष्ट्रातील पहिला सार्वजनिक-खासगी भागीदारी (PPP) तत्त्वावरील कांताई बंधारा उभारण्यात अजितदादांची मोलाची भूमिका होती. त्यांच्या सिंचन क्षेत्रातील दूरदृष्टीमुळे कांताई बंधाऱ्याच्या परिसरासह मागील सात ते आठ किलोमीटर अंतरावरील गावांचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटण्यास मदत झाली. शेती बागायती झाली आणि परिसरातील शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन घडले. जैन हिल्स येथील कृषी संशोधन, कमी पाण्यात अधिक उत्पादन देणारे तंत्रज्ञानातून शेतकऱ्यांचे हित साधणाऱ्या संशोधनाविषयी अजितदादांना विशेष आस्था होती. ते या संशोधनाचा आवर्जून अभ्यास करत आणि शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून निर्णय घेत असत. सहकार, राजकारण, उद्योग किंवा अन्य कोणतेही क्षेत्र असो, प्रत्येक घटकाला सोबत घेऊन काम करण्याची त्यांची हातोटी विलक्षण होती. हीच कार्यपद्धती आदरणीय शरद पवार साहेबांमध्येही दिसून येते. पवार साहेबांचा वारसा अजितदादांच्या कामाच्या पद्धतीतूनही अनुभवायला मिळाला. अजितदादांसारखे व्यक्तिमत्त्व महाराष्ट्रात होणे नाही,” अशा शब्दांत अशोक जैन यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

कार्यक्रमाला जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, खासदार स्मिता वाघ, माजी मंत्री अनिल पाटील, आमदार चंद्रकांत सोनवणे, सुरेश भोळे, मंगेश चव्हाण, आमदार अमोल पाटील, जेडीसीसी बँकेचे अध्यक्ष संजय पवार, महापौर दीपमाला काळे, माजी खासदार ईश्वरलाल जैन, माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, डॉ. सतीश पाटील, माजी आमदार साहेबराव पाटील, माजी आमदार शरद पाटील, अॅड. रविंद्रभैय्या पाटील, बँकेचे व्यवस्थापकीय संचालक जितेंद्र देशमुख, यांच्यासह बँकेचे संचालक मंडळ, प्रदीप देशमुख, रोहित निकम, माजी महापौर जयश्री महाजन, विष्णू भंगाळे, लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे, संचालक जनाबाई महाजन, भुसावळचे माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे, डी. के. पाटील, डी. जी. पाटील, राजीव पाटील, डॉ.सुरेश शामराव पाटील, प्रशांत चौधरी, शामकांत सनेर, तिलोत्तमा पाटील, प्रमोद पाटील, दीपक सूर्यवंशी आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुतळ्याची निर्मिती करणारे शिल्पकार श्रेयस व मिलींद गर्गे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ग्रामगौरव तर्फे अजितदादांवरील जीवनचरित्र असलेल्या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले.

जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवार यांनी प्रास्ताविकामध्ये अजितदादांच्या पुर्णाकृती पुतळ्याविषयी सांगितले. अमोल पाटील यांनी मनोगतातून आठवणींना उजाळा दिला. अजितदादा हे कामातून लोकनेते असल्याचे ईश्वरलाल जैन म्हणाले. दुष्काळासारखी परिस्थितीमध्ये अजितदादांच्या कठोर परंतू लोकांसाठी योग्य वित्तीय शिस्तीच्या निर्णयांची प्रशासनावरील पकड वाखण्याजोगे असल्याचे संजय सावकारे म्हणाले. ग्रामीण भागातील अर्थकारणाला चालना देणारे काम हे अजितदादांनी केल्याचे अनिल पाटील यांनी सांगितले. कार्यमग्नता हेच जीवन मानणारा नेता म्हणजे अजितदादा असल्याचे मंगेश चव्हाण म्हणाले. कुठलाही पुतळा कसा असावा, त्यापेक्षा त्या व्यक्तींचे विचार किती प्रेरणा देणारे असतील, हे महत्त्वाचे असून अजितदादा हे लोकनेते असल्याचे आमदार सुरेश भोळे म्हणाले. तर पुढच्या पिढीसाठी शिस्तप्रिय नेताचा ठेवा म्हणजे अजितदादांचा पुर्णाकृती पुतळा असल्याचे खासदार स्मिता वाघ म्हणाले.
गुलाबराव देवकर यांनी आभार मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. हर्षल पाटील यांनी सूत्रसंचालन केले.

पाडळसरे धरणाला अजित पवारांच्या नावासाठी प्रयत्न करणार – पालकमंत्री गुलाबराव पाटील
व्यक्ती म्हणून अजितदादा खूप स्पष्टवक्ते होते. जिल्हा बँकेमध्ये त्यांचा देखणा पुतळा उभारला असल्याने आपली सर्वांची जबाबदारी आणखी वाढली आहे. बँकेला त्यांच्या विचारातूनच प्रगतीपथावर न्यावे लागेल. जळगाव आणि धुळे जिल्ह्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेले पाडळसरे धरण हे गेल्या २९ वर्षांपासून प्रलंबित आहे. नुकतीच या धरणासाठी चौथी सुधारित प्रशासकीय मान्यता (सुप्रमा) मिळाली आहे. केंद्र सरकारच्या विविध सिंचन योजनांतर्गत यासाठी निधी उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पाडळसरे धरण पुर्णत्वास येण्यासाठी अजित दादांनी खूप मेहनत घेतली होती. त्यांच्या या कार्यामुळेच कामाला गती मिळाली आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्हावाशीयांच्या वतीने पालकमंत्री या नात्याने जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह विधानसभा व विधानपरिषद दोन्ही सभागृहात पाडळसरे धरणाला अजित पवार यांचे नाव देण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव मांडून त्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी समारोपीय मनोगतात सांगितले.

महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी क्षण – बाबासाहेब पाटील
यावेळी सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी स्वच्छता, शिस्त, प्रामाणिकपणामुळे संघर्षात सुद्धा यश मिळत असल्याचे अजितदादांच्या नेतृत्त्वांने दाखवून दिल्याचे सांगितले. त्यादृष्टीने जिल्हा बँकेने कार्य करावे, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. जळगावातील जैन उद्योग समूहाच्या शेती व जलक्षेत्रातील कार्याचा गौरव आपल्या भाषणात करीत शेती आणि पाण्याच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण काम करणाऱ्या या भूमीत सहकार क्षेत्रातून आपल्या राजकीय कार्याची सुरुवात करणाऱ्या अजितदादांच्या पुतळ्याचे लोकार्पण जिल्हा सहकारी बँकमध्ये होणे हा क्षण महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.


 

 

Previous Post

सीए पराग जैन यांना पीएच.डी . पदवी घोषित

Next Post

रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यासह गटारी मोकळ्या करण्याचे निर्देश

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यासह गटारी मोकळ्या करण्याचे निर्देश

रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यासह गटारी मोकळ्या करण्याचे निर्देश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यासह गटारी मोकळ्या करण्याचे निर्देश
खान्देश

रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यासह गटारी मोकळ्या करण्याचे निर्देश

October 25, 2026
सिंचन क्षेत्रातील दूरदृष्टी असलेले नेते म्हणजे अजितदादा! – अशोक जैन
खान्देश

सिंचन क्षेत्रातील दूरदृष्टी असलेले नेते म्हणजे अजितदादा! – अशोक जैन

October 25, 2026
अनुभूती बालनिकेतन व माणुसकी सेवा फाउंडेशनतर्फे बालदिनानिमित्त बालकांच्या कलागुणांना मिळणार हक्काचे व्यासपीठ!
जैन कंपनी

सीए पराग जैन यांना पीएच.डी . पदवी घोषित

October 25, 2026
अनुभूती बालनिकेतन व माणुसकी सेवा फाउंडेशनतर्फे बालदिनानिमित्त बालकांच्या कलागुणांना मिळणार हक्काचे व्यासपीठ!
जैन कंपनी

अनुभूती बालनिकेतन व माणुसकी सेवा फाउंडेशनतर्फे बालदिनानिमित्त बालकांच्या कलागुणांना मिळणार हक्काचे व्यासपीठ!

October 25, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यासह गटारी मोकळ्या करण्याचे निर्देश

रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यासह गटारी मोकळ्या करण्याचे निर्देश

October 25, 2026
सिंचन क्षेत्रातील दूरदृष्टी असलेले नेते म्हणजे अजितदादा! – अशोक जैन

सिंचन क्षेत्रातील दूरदृष्टी असलेले नेते म्हणजे अजितदादा! – अशोक जैन

October 25, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon