गुलाबराव देवकर, गुलाबराव वाघ यांची प्रमुख उपस्थिती
धरणगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील पाळधी – चांदसर जिल्हा परिषद गटात महाविकास आघाडीच्या प्रचार दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. महाविकास आघाडीचे उमेदवार करण पाटील यांनी नागरिकांना भेटून महाविकास आघाडीच्या उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन केले. यावेळी माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, गुलाबराव वाघ, रविंद्र पाटील, निलेश चौधरी, रमेश माणिक पाटील, सी.के. पाटील, डॉ.व्ही.डी.पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
पाळधी येथे मारवाडी गल्ली, गुज्जर वाडा, धनगर वाडा, ६० घर मोहल्लामार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, माळीवाडा यांसह विविध भागात करण पाटील यांचे औक्षण करून स्वागत करण्यात आले. पाळधी खु. च्या माजी सरपंच आशाबाई पाटील यांनी देखील करण पाटील यांचे औक्षण करून स्वागत केले.
दोनगाव येथे प्रगतिशील शेतकरी गंभीर पाटील, माजी सरपंच सुभाष पाटील, रविंद्र पाटील, सरपंच सपना सोनवणे, ग्रा. पं. सदस्य संगीता पाटील, लोटन पाटील, जगदीश पाटील, माजी जि. प. सदस्य रविंद्र पाटील आदी मान्यवरांच्या घरी करण पाटील यांचे औक्षण करून स्वागत करण्यात आले. त्यानंतर निळकंठेश्र्वर महादेव मंदिर येथे करण पाटील यांच्याहस्ते आरती करून नारळ ओवाळण्यात आले.
रेल, लाडली, चांदसर येथे देखील करण पाटील यांचे फटाके फोडून स्वागत करण्यात आले. याप्रसंगी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष डॉ. व्ही. डी. पाटील, माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष डॉ. व्ही. डी. पाटील, धरणगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा सोनवदचे सरपंच दिलीप धनगर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रघुनाना पाटील, रवींद्र पाटील, रामराव सावंत, माजी जि. प. सदस्य रवींद्र पाटील, ग्रा.पं. सदस्य शकील देशमुख, ऑल इंडिया पँथर सेनाचे तालुकाध्यक्ष सुनील सोनवणे, राष्ट्रवादीचे कार्यालय सचिव संजय चव्हाण, किसान सेलचे जिल्हा सचिव नारायण चौधरी, शेतकरी सेना तालुकाप्रमुख विजय पाटील, सरपंच पती हेमंत पाटील, राजू पाटील, काँग्रेसचे शरीफ पटेल, बशीर शेख, अकील देशमुख, राष्ट्रवादीचे धरणगाव तालुकाध्यक्ष धनराज माळी, राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्ष मनोज पाटील, विलास पवार, संतोष सोनवणे, युवासेना तालुकाप्रमुख स्वप्नील परदेशी यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.