जळगाव तालुक्यातील भागपूर शिवारातील शेत गट नंबर ८ मधील शेती हे भागपूर मातीच्या धरणासाठी आरक्षीत असतानाही शेतात अंब्याची झाडे लावून शासनाची फसवणूक केल्याची बाब समोर आली. याप्रकरणी मंगळवार, १० ऑक्टोबर रोजी शासनाचे कर्मचारी हेमंत मुरलीधर गीरी यांनी नशिराबाद पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर नेहा जितेंद्र अग्रवाल, जितेंद्र हनुमानदास अग्रवाल, निधी निखील पसारी, अनिता अनुप अग्रवाल (सर्व रा. आर.जे.टॉवर, भास्कर मार्केट, जळगाव) यांच्या विरोधात नशिराबाद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक निरीक्षक रामेश्वर मोताळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अलियार खान करीत आहे.