आ. राजूमामा भोळेंच्या हस्ते दिले सहकार्याचे पत्र
जळगाव (प्रतिनिधी) : महापालिकेच्या निवडणुकीतील महायुतीचे प्रभाग १३ (ड) मधील अधिकृत उमेदवार प्रफुल्ल गुलाबराव देवकर यांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आता या प्रभागातील अपक्ष उमेदवार मगन व्यंकट पाटील आणि अनिल रमेशचंद्र पगारिया यांनीही प्रफुल्ल देवकर यांना जाहीर पाठिंबा दिला आहे.


भाजप नेते मंत्री गिरीश महाजन, शिवसेनेचे नेते तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार राजूमामा भोळे यांच्या प्रयत्नांनी प्रभाग १३ मध्ये आधीच मोठ्या प्रमाणात विकासाची कामे करण्यात आली आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जळगावला विकसित श्रेणीत आणण्याचा संकल्प केल्यानंतर या प्रभागात पुढील पाच वर्षाच्या कालखंडात आणखी जोमाने उर्वरित विकासकामांना चालना मिळणार आहे.
या पार्श्वभूमीवर, प्रभाग १३ (ड) मधील अपक्ष उमेदवार मगन व्यंकट पाटील यांच्यासह अनिल रमेशचंद्र पगारिया यांनीही आता प्रफुल्ल देवकर यांच्यासाठी एक पाऊल मागे घेतले. मगन पाटील यांनी प्रफुल्ल देवकर यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर जाहीर पाठिंबा दिला आहे. अनिल पगारिया यांनीही प्रभाग १३ (ड) च्या सर्वागीण विकासासाठी प्रफुल्ल देवकर यांना आपला जाहीर पाठिंबा दिला.









