जळगाव तालुक्यातील कारवाई
जळगाव (प्रतिनिधी) :- जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या निर्देशानुसार तसेच राज्य उत्पादन शुल्क अधिक्षक व्ही.टि.भुकन यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने जळगाव तालुक्यात देऊळवाडा या ठिकाणी तापी नदीच्या किनारी व परिसरामध्ये छापेमारी करून दि. ४ रोजी एकूण ६ गुन्हे नोंदवले आहे. छापेमारीमधे ४ लाख ९४ हजार २० इतक्या किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
यात गावठी दारू २२२ लिटर जप्त करण्यात आली. राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध मद्य निर्मिती व विक्रीवर कारवाई चे सत्र चालूच ठेवले असून एप्रिल २०२३ मध्ये २०२२ च्या तुलनेत कारवाई मधे मोठी वाढ झाली आहे. सदरची कारवाई निरीक्षक विभागीय भरारी पथक, जळगांव, निरीक्षक जळगाव, दुय्यम निरीक्षक चोपडा यांच्या पथकाने संयुक्तरीत्या पार पाडली.