जळगाव – येथील गोदावरी फाऊंडेशन संचलित विविध शैक्षणिक संस्थांतर्फे माजी पंतप्रधान स्व.राजीव गांधी यांच्या स्मृतीदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय येथे शुक्रवारी देशाचे माजी पंतप्रधान स्व.राजीव गांधी यांच्या स्मृतीदिनानिमित्त कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला गोदावरी फाऊंडेशनच्या संचालिका डॉ.केतकी पाटील, डॉ.वैभव पाटील यांच्या हस्ते स्व.राजीव गांधी यांच्या प्रतिमेला मार्ल्यापण करण्यात आले. गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा माजी खासदार डॉ.उल्हास पाटील यांनी स्व.राजीव गांधी यांनी पंतप्रधान काळात केलेल्या जनहिताच्या कार्याला उजाळा दिला. याप्रसंगी गोदावरी फाऊंडेशनचे मार्गदर्शक सुभाष पाटील, संचालिका डॉ.केतकी पाटील, डॉ.वैभव पाटील, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.एन.एस.आर्विकर, रजिस्ट्रार प्रमोद भिरुड, एन.जी.चौधरी, लेखापाल योगेश पाटील, विकास बेंडाळे, विकास जावळे, सुनिल बोंडे, अनंत इंगळे, प्रविण कोल्हे, डॉ.संकेत पाटील, कोंडलनाईक मेघावत, दिपक पाटील यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी वृंद उपस्थीत होते.
यासोबतच गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय, डॉ.उल्हास पाटील रुग्णालय, गोदावरी सीबीएसई स्कुल, गोदावरी आयएमआर महाविद्यालय, विधी व विज्ञान महाविद्यालय, डॉ.उल्हास पाटील कृषी व कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय, गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग, डॉ.उल्हास पाटील होमियोपॅथी तसेच फिजीयोथेरपी महाविद्यालयातही स्व.राजीव गांधी यांना अभिवादन करण्यात आले. कोविडच्या शासकीय नियमांचे पालन करुन हा कार्यक्रम पार पडला.