मुंबई ( वृत्तसंस्था ) ;- पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये उडालेल्या भीषण चकमकीत तब्बल 13 नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात गडचिरोली पोलिसांना यश आले आहे. सदर घटना आज पहाटेच्या दरम्यान एटापल्ली तालुक्यातील पयडी-कोटमी जंगलात घडली
प्राप्त माहितीनुसार शुक्रवारी पहाटेच्या दरम्यान जिल्हा पोलीस दलाचे सी-60 पथकाच्या काही तुकड्या पयडी-कोटमी जंगल परिसरात नक्षल शोध अभियान राबवित असताना जंगलात दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांनी पोलिसांवर अंधाधुंद गोळीबार केला. प्रतिउत्तरात पोलिसांनी ही गोळीबार केला. पोलिसांचा वाढता दबाव पाहून नक्षली जंगलात पसार झाले. घटना स्थळी शोध घेतले असता नक्षलवाद्यांचे तब्बल 13 मृतदेह पोलिसांना आढळून आले सदर मृतदेह ताब्यात घेऊन पोलिसांकडून परिसरात शोध अभियान तीव्र करण्यात आले असून अजून काही मृतदेह मिळण्याची शक्यता आहे या कारवाईने नक्षल संघटनेला मोठा हादरा बसला आहे