• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

कोरोनाला रोखण्यासाठी नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने नियमांचे पालन करावे – जिल्हाधिकारी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 15, 2021
in आरोग्य, कोरोना, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0

जळगाव, (प्रतिनिधी) ;- कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत लागू करण्यात आलेल्या निर्बंधांची प्रशासनातील सर्व घटक पूर्ण ताकदीने अंमलबजावणी करीत असूनही बाधित रुग्णसंख्या कमी होताना दिसून येत नाही, ही चिंतेची बाब आहे. कोरोना महामारीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी यापुढे नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने नियमांचे पालन करावे. अन्यथा प्रशासनास कठोर कारवाई शिवाय पर्याय उपलब्ध राहणार नाही. असा इशारा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आज दिला.

येथील पोलीस मुख्यालयातील प्रेरणा सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंढे, महापालिका आयुक्त सतीश कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, सहाय्यक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. भीमाशंकर जमादार, महापालिकेचे उपायुक्त संतोष वाहुळे यांचेसह विविध विभागांचे अधिकारी, प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

प्रशासन निर्बंधांची अंमलबजावणी प्रभावीपणे करत असूनही जिल्ह्यात काही नागरिक अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली विनाकारण घराबाहेर पडत असून परिणामी असे नागरिक स्वत:बरोबरच दुसऱ्यांनाही बाधित करतात. लसीकरणासाठी अनावश्यक गर्दी करणारे नागरिक, कोरोना बाधित रुग्णांसोबत दवाखान्यात गर्दी करणारे नातेवाईंक, अरुंद गल्ली बोळांत बेकायदेशीरपणे भाजीपाला विक्रेते थाटत असलेली दुकाने आणि त्यावर होणारी गर्दी, काही नागरिक 7 ते 11 वाजेदरम्यान किराणा दुकाने, भाजीपाला दुकाने, फळविक्री दुकानांवर विनाकारण गर्दी करणारे नागरिक यांच्यामुळे कोरोना आटोक्यात येण्यात अडथळे येत असल्याचे सांगून जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की, प्रशासनाने या सर्व बाबींचा गांभीर्याने विचार करून 31 मे पर्यंत लॉकडाऊनचे निर्बंध अधिक कडक करण्याचा निर्णय घेतला असून तसे आदेश सर्व संबंधित यंत्रणांना दिले आहेत.

लसीकरणासाठी होणारी गर्दी लक्षात घेता आरोग्य विभागाने उपलब्ध डोसनुसार आदल्या दिवशीच दुपारी 4 वाजेनंतर संबंधित लसीकरण केंद्रांवर कुपनचे वाटप करावे, म्हणजे दुस-या दिवशी अनावश्यक होणारी गर्दी टाळता येईल. शिवाय सर्वांना लस उपलब्ध होईल. कोरोना रुग्णांची आरोग्य विभागाकडून आवश्यक ती काळजी घेतली जात आहे असा विश्वास त्यांच्या नातेवाईंकांना वाटावा यासाठी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईंकांमध्ये व्हीडीओ काॅलद्वारे संवाद साधून द्यावा जेणेकरून नातेवाईक रुग्णांना भेटण्यासाठी दवाखान्यात येण्याचा आग्रह धरणार नाहीत. यासाठी आवश्यक नियोजन करण्याच्या सुचनाही जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सर्व संबंधितांना दिल्यात.

विनाकारण फिरणा-यांवर कठोर कारवाई – डाॅ. मुंढे

जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी प्रशासनाने दिलेल्या वेळेनंतरही काही नागरीक विनाकारण बाहेर फिरतांना दिसत असून पोलीस त्यांच्यावर योग्य ती कारावाईही करत आहेत. परंतु यापुढे अशा विनाकारण फिरणाऱ्यांवर अधिकाधिक कडक कारवाई करण्याच्या सूचना सर्व पोलीस, गृहरक्षक दलाच्या कर्मचाऱ्यांना दिलेल्या आहेत. यापुढे नागरिकांनी अशाप्रकारे विनाकारण बाहेर फिरणे टाळावे. अन्यथा गुन्हे दाखल सारख्या कारवाईस सामोरे जावे लागेल. असा इशारा पोलीस अधीक्षक डाॅ. मुंढे यांनी दिला. आपल्या जीवापेक्षा काहीही महत्त्वाचे नसल्याने नागरीकांनी त्यास महत्त्व देऊन आपल्यासह सर्वांना सुरक्षित ठेवण्याचे आवाहनही त्यांनी केले.

भाजीपाला व फळ विक्रेत्यांनी नेमून दिलेल्या जागेवरच विक्री करावी – कुलकर्णी

महानगर पालिका आयुक्त सतीश कुलकर्णी म्हणाले की, कोरोनाला आळा घालण्यासाठी फळ आणि भाजी विक्रेत्यांनी महानगरपालिकेने नेमून दिलेल्या जागेवरच बसून व्रिकी करावीत. अनधिकृत जागेवर तसेच सकाळी 7 ते 11 या नियोजित वेळेआधी किंवा नंतर आणि इतर कोठेही विक्री करतांना आढळल्यास त्यांचेवर अतिक्रमण निर्मूलन विभागामार्फत कडक कारवाई करण्यात येईल. असा इशाराही त्यांनी दिला. शहरातील मोठ्या चौकांमध्ये होणारी गर्दी टाळण्यासाठी नागरिकांनी महानगरपालिका प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.


 

 

Previous Post

शिरसोली येथे रक्तदान शिबिराचे आयोजन

Next Post

जवानाचा मृतदेह विहिरीत आढळल्याने जिल्ह्यात खळबळ

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जवानाचा मृतदेह विहिरीत आढळल्याने जिल्ह्यात खळबळ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डॉ. अनिल पाटीलाचा ’महाराष्ट्र वैद्यकीय परिषद’ निवडणुकीत विक्रमी विजय
1xbet russia

डॉ. अनिल पाटीलाचा ’महाराष्ट्र वैद्यकीय परिषद’ निवडणुकीत विक्रमी विजय

May 2, 2026
डॉ. उल्हास पाटील, महादेव रूग्णालयात अत्याधुनिक कोब्लाटर यंत्रणा उपलब्ध
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील, महादेव रूग्णालयात अत्याधुनिक कोब्लाटर यंत्रणा उपलब्ध

May 2, 2026
भरधाव वाहनाची धडक; ४५ वर्षीय व्यक्ती गंभीर जखमी, चालक फरार
1xbet russia

भरधाव वाहनाची धडक; ४५ वर्षीय व्यक्ती गंभीर जखमी, चालक फरार

May 2, 2026
जळगाव एमआयडीसीत भीषण आग; सिलिंडर स्फोटांनी परिसर हादरला
1xbet russia

जळगाव एमआयडीसीत भीषण आग; सिलिंडर स्फोटांनी परिसर हादरला

May 2, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

डॉ. अनिल पाटीलाचा ’महाराष्ट्र वैद्यकीय परिषद’ निवडणुकीत विक्रमी विजय

डॉ. अनिल पाटीलाचा ’महाराष्ट्र वैद्यकीय परिषद’ निवडणुकीत विक्रमी विजय

May 2, 2026
डॉ. उल्हास पाटील, महादेव रूग्णालयात अत्याधुनिक कोब्लाटर यंत्रणा उपलब्ध

डॉ. उल्हास पाटील, महादेव रूग्णालयात अत्याधुनिक कोब्लाटर यंत्रणा उपलब्ध

May 2, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon