मुंबईतील संघटित गुन्हेगारीला आळा घालणारा, गँगवॉर संपविणारा एक धडाकेबाज अधिकारी म्हणून मुंबई पोलीस दलात ख्याती असलेल्या दया नायक यांची आज विदर्भातील गोंदिया जिल्ह्यात बदली करण्यात आल्याचे आदेश अप्पर पोलीस महासंचालक कुलवंत सारंगल यांनी जारी केले.
दया नायक हे महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाच्या जुहू युनिटचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक होते. दीड वर्षापूर्वी त्यांची खार पोलीस ठाण्यातून एटीएसच्या जुहू युनिटला नियुक्ती करण्यात आली होती. यादरम्यान त्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली होती. ड्रगमाफियांचे कंबरडे मोडले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना नेते-खासदार संजय राऊत तसेच मातोश्री बंगल्यावर धमक्यांचे फोन करणाऱया एका आरोपीला दया नायक व त्यांच्या सहकाऱयांनीच कोलकाता येथे सापळा रचून अटक केली होती.