डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात डीएल स्कोपीद्वारे यशस्वी शस्त्रक्रिया,बारावीचा पेपरचे संकट टळले
जळगाव ( प्रतिनिधी ) – दात कोरतांना बालिकेने शिलाईची सुई गिळल्याने जीवघेणी परीस्थिती निर्माण झाली होती. मात्र डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रूग्णालयातील नाक-कान-घसा तज्ञांनी डीएल स्कोपीद्वारे शस्त्रक्रिया करून घशात शिरलली सुई काढण्यात यश मिळविले.याबाबत माहिती अशी की, मोहीनी तळेले (वय १६) या बालिकेने दात कोरतांना अचानक सुई गिळली. ही सुई अन्ननलिकेच्या वरील भागात घशाच्या पोकळीत अडकली. त्यामुळे तिला घशाला टोचत असल्याने तीला तातडीने डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात दाखल करण्यात आले. याठिकाणी नाक-कान-घसा तज्ञ डॉ. अनुश्री अग्रवाल यांनी तिची एक्स-रे तपासणी केली. यात सुई घशाच्या पोकळीत शिरल्याचे दिसून आले. डॉ. अग्रवाल यांनी तातडीने या बालिकेवर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. तत्पूर्वी बालिकेला अल्पकालीन भूल देण्यात आली. त्यानंतर डीएल स्कोपीद्वारे शस्त्रक्रिया करून बालिकेच्या घशात अडकलेली सुई काढण्यात यश मिळविले. या शस्त्रक्रियेसाठी डॉ. जान्हवी बनकर, डॉ. रितु रावल, डॉ. सायकत बासू, डॉ. अंकीता सोलंकी, भूलशास्त्र तज्ञ डॉ. चैतन्य भोळे यांनी सहकार्य केले.अन् बारावीची परीक्षेचे संकट टळलेमोहिनी हीची बारावीची परीक्षा सध्या सुरू आहे. अशा परीस्थितीत अनावधानाने तिच्या घशात सुई शिरल्याने तीला मोठे टेंशन आले होते. आधीच बारावी परीक्षा आणि त्यात अशी जीवघेणी परीस्थिती यामुळे मोहिनी मोठ्या संकटातच सापडली. आपल्याला आता पेपर देता येणार नाही असे संकटच तिच्यासमोर उभे राहिले. मात्र डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात नाक-कान-घसा तज्ञांनी केलेल्या शस्त्रक्रियेमुळे परीक्षेचे संकट टळले आणि मोहिनी शस्त्रक्रियेनंतर अवघ्या काही तासात परीक्षा द्यायला गेली.
अनेकदा काही जण कान, दात काडीने किंवा तत्सम वस्तूने कोरतात. परीणामी एखाद्या वेळी अशा वस्तुंमुळे मोठी इजा पोहोचण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा गोष्टी कटाक्षाने टाळल्या पाहिजे. तसेच ज्यांच्या कुणाकडून अनावधानाने अशी वस्तु कान किंवा घशात अडकल्यास त्वरीत डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात संपर्क साधावा.- डॉ. अनुश्री अग्रवाल, विभागप्रमुख