• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

दशरथ महाजन अपघात घटनेत  खोटा बनाव उघड, खून करण्याचा प्रयत्न असणाऱ्या तिघांना एलसीबीकडून बेड्या !  

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 27, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
दशरथ महाजन अपघात घटनेत  खोटा बनाव उघड, खून करण्याचा प्रयत्न असणाऱ्या तिघांना एलसीबीकडून बेड्या !  

एरंडोल तालुक्यात भालगाव रस्त्यावर घडली होती घटना

जळगाव ( प्रतिनिधी ) – एरंडोल येथील माजी उपनगराध्यक्ष दशरथ बुधा महाजन यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने तीन संशयित आरोपींना अटक केली आहे. हा अपघात नसून, पूर्वनियोजित हल्ला असल्याचे तपासात उघड झाले आहे. याबाबतची सविस्तर माहिती पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी पत्रकारांना दिली.

दिनांक १४ जून रोजी एरंडोल पोलीस स्टेशनमध्ये कल्पना दशरथ महाजन (माजी नगरसेविका) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दशरथ महाजन हे एरंडोल नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष असल्याने त्यांचे अनेक राजकीय व्यक्तींशी मतभेद होते. यामुळे फिर्यादी आणि त्यांच्या नातेवाईकांनी दशरथ महाजन यांचा अपघात नसून घातपात असल्याची शक्यता व्यक्त केली होती.(केसीएन) प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन, जळगावचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांच्याकडे सोपवला. त्यांच्या सूचना आणि मार्गदर्शनानुसार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेची दोन पथके तयार केली. या पथकांनी घटनास्थळाची बारकाईने तपासणी केली आणि घटनास्थळाकडे ये-जा करणाऱ्या रस्त्यांवरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली.

वादळ आणि पावसामुळे अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाल्याने सीसीटीव्ही फुटेज मिळवण्यात अडचणी आल्या. परंतु, तपास पथकातील पोलीस हवालदार प्रवीण मांडोळे आणि राहुल कोळी यांनी एका पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही फुटेजचे सलग ८ तास परीक्षण करून आरोपींना निष्पन्न केले.(केसीएन)या तपासामुळे हा गुन्हा अपघात नसून घातपात असल्याचे समोर आले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संशयित आरोपी उमेश उर्फ बदक सुरेश सुतार (वय ४०), शुभम कैलास महाजन (वय १९) आणि पवन कैलास महाजन (वय २०, सर्व रा. एरंडोल) या तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान, आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. आरोपी उमेश उर्फ बदक सुरेश सुतार याने पूर्ववैमनस्यातून हा गुन्हा केल्याचे सांगितले.

गुन्ह्यात वापरलेली महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीची बोलेरो चारचाकी गाडी संशयित आरोपी उमेश उर्फ बदक सुरेश सुतारकडून जप्त करण्यात आली आहे. सध्या अटक केलेल्या आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असून, या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा पोलीस कसून(केसीएन)तपास करत आहेत.ही कारवाई डॉ. महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक, कविता नेरकर, अपर पोलीस अधीक्षक, विनायक कोते, उपविभागीय पोलीस अधिकारी, अमळनेर भाग यांच्या मार्गदर्शनाखाली संदीप पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा,निलेश गायकवाड, पोलीस निरीक्षक, एरंडोल पोलीस स्टेशन, पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, सोपान गोरे, आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील पोहवा/हरीलाल पाटील, संदीप पाटील, प्रवीण मांडोळे, अक्रम शेख, प्रवीण भालेराव, रवी कापडणे, राहुल कोळी, जितेंद्र पाटील, भूषण पाटील, तसेच एरंडोल पोलीस स्टेशनचे पोशि प्रशांत पाटील यांनी केली आहे.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

चोरट्यांची कमाल, पोलिसांची धमाल : तांत्रिक मदतीने तपास करीत मध्य प्रदेशातून शोधून आणला १६ टायर टिप्पर

Next Post

तेजस महाजन खूनप्रकरणी नरबळीचे कलम लावण्याची मागणी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
तेजस महाजन खूनप्रकरणी नरबळीचे कलम लावण्याची मागणी

तेजस महाजन खूनप्रकरणी नरबळीचे कलम लावण्याची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

प्रौढाची नैराश्यातून गळफास लावून घेत आत्महत्या
1xbet russia

४५ वर्षीय व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या

February 11, 2026
जळगाव महापालिकेत स्थायीसह महिला-बालकल्याण समितीच्या संख्याबळावर शिक्कामोर्तब
1xbet russia

जळगाव महापालिकेत स्थायीसह महिला-बालकल्याण समितीच्या संख्याबळावर शिक्कामोर्तब

February 11, 2026
महिला झोपून गेल्याचा फायदा घेत चोरट्याने १२ लाखांचे दागिने, रोकड लांबविली !
1xbet russia

लग्नाला जाणाऱ्या महिलेचे ९० हजारांचे दागिने लंपास

February 11, 2026
महाराष्ट्र अंनिसच्या शाखा कार्याध्यक्षपदी मिनाक्षी चौधरी, सचिवपदी हेमंत सोनवणे
1xbet russia

महाराष्ट्र अंनिसच्या शाखा कार्याध्यक्षपदी मिनाक्षी चौधरी, सचिवपदी हेमंत सोनवणे

February 11, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

प्रौढाची नैराश्यातून गळफास लावून घेत आत्महत्या

४५ वर्षीय व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या

February 11, 2026
जळगाव महापालिकेत स्थायीसह महिला-बालकल्याण समितीच्या संख्याबळावर शिक्कामोर्तब

जळगाव महापालिकेत स्थायीसह महिला-बालकल्याण समितीच्या संख्याबळावर शिक्कामोर्तब

February 11, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon