भुसावळ शहरातील घटना
भुसावळ (प्रतिनिधी) : शहरातील ढाके गल्लीत निलीमा किरण सरोदे (वय ४२) या महिला आपल्या परिवारासह वास्तव्याला आहेत. गुरूवार, १९ रोजी सकाळी १० वाजता गल्लीतील मनिषा उर्फ संगिता संतोष फालक या महिलेने निलीमा सरोदे यांना व त्यांचे पती किरण सरोदे यांना शिवीगाळ करून चापटा बुक्क्यांनी मारहाण करून गंभीर दुखापत केली.
या प्रकरणी निलीमा सरोदे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार मनिषा उर्फ संगीता संतोष फालक रा. ढाके गल्ली, भुसावळ यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ सिमा चौधरी हे करीत आहेत. दाम्पत्याला मारहाण, महिलेविरुद्ध गुन्हा दाखल.