• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

घरफोडीतील २ लाख ६९ हजारांचा ऐवज लांबवणाऱ्या चोरट्यास अटक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 31, 2024
in क्राईम, जळगाव
0
घरफोडीतील २ लाख ६९ हजारांचा ऐवज लांबवणाऱ्या चोरट्यास अटक

भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनची ३ दिवसात कारवाई

भुसावळ (प्रतिनिधी) : शहरातील गुंजाळ कॉलनी येथील वृद्धाचे घरी अज्ञात चोरटयांनी घरफोडी करून सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकुण २ लाख ६९ हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरून नेल्याची घटना रविवारी दि. २८ जुलै रोजी सकाळी ९.३० वाजता समोर आली आहे. याप्रकरणी सोमवारी २९ जुलै रोजी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनने तीन दिवसात संशयित आरोपी निष्पन्न करून त्याच्याकडून पूर्ण मुद्देमाल ताब्यात घेण्यात यश मिळवले आहे.

रामप्रसाद गोपाल चंदन (वय-६६, रा. गुंजाळ कॉलनी, भुसावळ) हे परिवारासह राहतात. दि. २७ जुलै रोजी रात्री १० वाजेपासून ते दि. २८ जुलै रोजी सकाळी ९.३० वाजेच्या दरम्यान त्यांचे घर बंद होते. याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी घराच्या कंपाउंड गेटचे आणि मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश करत कपाटातून सोन्याचे व चांदीचे दागिने आणि रोकड असा एकूण २ लाख ६९ हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरून नेला.

ही घटना रविवारी २८ जुलै रोजी सकाळी ९.३० वाजता समोर आली. या घटनेबाबत रामप्रसाद चंदन यांनी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान पोलीस पथकाला ही चोरी जावेद शेख शकील (वय २५, रा. रामदास वाडी, भुसावळ) यानी केल्याचे निष्पन्न झाले. त्याला पोलीस उपनिरीक्षक मंगेश जाधव, विजय नेरकर, निलेश चौधरी, जावेद शहा, योगेश महाजन, राहुल वानखेडे, सचिन चौधरी यांनी ताब्यात घेतले.

त्याची कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्यात चोरलेला सर्व मुद्देमाल काढून दिला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक गजानन पडघन यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.

Previous Post

मद्यपी तरुणाचा पोलीस ठाण्यात धिंगाणा, कर्मचाऱ्याची कॉलर पकडून फेकले जमिनीवर !

Next Post

कारागृह अधीक्षक अनिल वांढेकर यांची पदोन्नतीने मुंबई येथे बदली

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
कारागृह अधीक्षक अनिल वांढेकर यांची पदोन्नतीने मुंबई येथे बदली

कारागृह अधीक्षक अनिल वांढेकर यांची पदोन्नतीने मुंबई येथे बदली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गायत्रीनगर परिसरात ६० वृक्षांचे रोपण; LNS हायस्कूलच्या ‘८८ बॅच’चा पर्यावरण संवर्धनाचा स्तुत्य उपक्रम
1xbet russia

गायत्रीनगर परिसरात ६० वृक्षांचे रोपण; LNS हायस्कूलच्या ‘८८ बॅच’चा पर्यावरण संवर्धनाचा स्तुत्य उपक्रम

July 20, 2026
डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयात कृषी शिक्षणासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू
1xbet russia

लैंगिक छळमुक्त कार्यस्थळ निर्मितीसाठी शिक्षक व कर्मचार्‍यांचे  पॉश अ‍ॅक्ट  अंतर्गत प्रबोधन

July 20, 2026
डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयात कृषी शिक्षणासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयात कृषी शिक्षणासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

July 20, 2026
महसूल पथकाच्या ताब्यातील वाळूने भरलेला डंपर पळविला; चालक, मालकासह एमआयडीसी पोलीसात  तिघांविरुद्ध गुन्हा
1xbet russia

महसूल पथकाच्या ताब्यातील वाळूने भरलेला डंपर पळविला; चालक, मालकासह एमआयडीसी पोलीसात  तिघांविरुद्ध गुन्हा

July 20, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गायत्रीनगर परिसरात ६० वृक्षांचे रोपण; LNS हायस्कूलच्या ‘८८ बॅच’चा पर्यावरण संवर्धनाचा स्तुत्य उपक्रम

गायत्रीनगर परिसरात ६० वृक्षांचे रोपण; LNS हायस्कूलच्या ‘८८ बॅच’चा पर्यावरण संवर्धनाचा स्तुत्य उपक्रम

July 20, 2026
डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयात कृषी शिक्षणासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

लैंगिक छळमुक्त कार्यस्थळ निर्मितीसाठी शिक्षक व कर्मचार्‍यांचे  पॉश अ‍ॅक्ट  अंतर्गत प्रबोधन

July 20, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!