यावल ( प्रतिनिधी ) – चोपडा रोडवरील महाजन पेट्रोल पंपाजवळील शेतातून ज्वारीची कणसे चोरुन नेल्याचे उघडकीला आले आहे. छावणी पोलिस ठाण्यात ६ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शेख गुलाम रसूल अब्दुल नबी ( वय 70 रा.बाबूजी पुरा ) यांचे चोपडा रोडवरील महाजन पेट्रोल पंपाजवळ शेत आहे. त्यांनी ज्वारीचे पीक पेरले आहे. 19 ऑक्टोबररोजी सकाळी गावातील राजीव वामन कोलते, सुनिल वामन कोलते, गणेश राजू कोलते, बापू वामन कोलते, अरुण राजू कोलते आणि संगीता सुनील कोलते (सर्व रा- यावल) यांनी शेतातील ज्वारीची कणसे कापून चोरून नेली व जास्त बोलू नका तुला पण कापून टाकु अशी धमकी दिली. शेख गुलाम रसूल अब्दुल नबी यांच्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.पुढील तपास सहायक फौजदार नेताजी वंजारे करीत आहेत .