• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

विटांचे ट्रॅक्टर आल्याचा बनाव; सुनसगावात दाम्पत्याची ५० हजारांची फसवणूक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 14, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव
0
कंपनीत नोकरी लावून देण्याच्या नावाखाली तरुणाची १० लाखांमध्ये फसवणूक

विटांचे ट्रॅक्टर आल्याचा बनाव; सुनसगावात दाम्पत्याची ५० हजारांची फसवणूक
भरवस्तीतील मुख्य रस्त्यावर दिवसाढवळ्या प्रकार; भामटा सीसीटीव्हीत कैद

भुसावळ : तालुक्यातील सुनसगाव येथे विटांचे ट्रॅक्टर आल्याचा खोटा बहाणा करून एका दाम्पत्याकडून ५० हजार रुपये उकळल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (दि. १२) दुपारी घडली. विशेष म्हणजे ही फसवणूक गावातील मुख्य रस्त्यावर, भर वस्तीमध्ये आणि दिवसाढवळ्या करण्यात आली असून, संबंधित अज्ञात भामटा परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या प्रकरणी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

सुनसगाव येथील सुपडू बोराळे (वय ४५, मजुरी) व पल्लवी बोराळे (वय ४०, अंगणवाडी सेविका) हे आपल्या कुटुंबासह गावातील मुख्य रस्त्यालगत वास्तव्यास आहेत. दुपारी सुमारे दोन वाजेच्या सुमारास एक अनोळखी इसम मोटारसायकलवर त्यांच्या घराजवळ आला. ‘विटांचे ट्रॅक्टर आले असून रस्ता दाखवा,’ असे सांगत त्याने विश्वास संपादन केला. त्यानंतर सुपडू बोराळे यांना मोटारसायकलवर बसवून तो गोंभी फाटा येथील केळी वेफर्सच्या दुकानाजवळ घेऊन गेला. ‘मी घरातून विटांचे पैसे घेऊन येतो,’ असे सांगून तो मोटारसायकलसह तेथून पसार झाला.

दरम्यान, तोच इसम थेट बोराळे यांच्या घरी परतला. त्या वेळी पल्लवी बोराळे भाजीपाला निवडत होत्या. त्याने विटांचे पैसे देण्याची मागणी केली. पल्लवी बोराळे यांनी ग्रामसंघाच्या माध्यमातून सीआयएफचे ६० हजार रुपयांचे कर्ज घेतले असून, ही रक्कम घरातील कपाटात ठेवलेली होती. सुरुवातीला त्यांनी १० हजार रुपये देऊ करताच त्या इसमाने मोबाईलवर बोलण्याचे नाटक करून, ‘१० नको, ५० हजार द्या,’ अशी मागणी केली. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून पल्लवी बोराळे यांनी ५० हजार रुपये त्याच्या हाती दिले. पैसे घेताच तो इसम तात्काळ निघून गेला.

काही वेळानंतर सुपडू बोराळे घरी परतल्यावर संपूर्ण प्रकार उघडकीस आला. संबंधित इसम आपल्याला ओळखीचा नसल्याचे लक्षात येताच दाम्पत्याच्या पायाखालची जमीन सरकली. परिसरातील शेजारच्या कृषी केंद्राच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा भामटा कैद झाला असून, तो नंबर प्लेट नसलेल्या होंडा शाईन मोटारसायकलवर आल्याचे फुटेजमध्ये स्पष्ट दिसून येत आहे.

फसवणूक झाल्याचे लक्षात येताच बोराळे दाम्पत्याने संध्याकाळी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलीस निरीक्षक महेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार धिरज मंडलिक तपास करीत असून, परिसरातील व मुख्य रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयित भामट्याचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.


 

 

Previous Post

औषधे घेत असताना दुचाकीच्या डिक्कीतून ८३ हजारांची रोकड लंपास

Next Post

आसोदा गोळीबार प्रकरणात निकाल; दोन आरोपी न्यायालयातून निर्दोष मुक्त

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
आसोदा गोळीबार प्रकरणात निकाल; दोन आरोपी न्यायालयातून निर्दोष मुक्त

आसोदा गोळीबार प्रकरणात निकाल; दोन आरोपी न्यायालयातून निर्दोष मुक्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ग्राहकांकडून गोळा केलेले हप्ते परस्पर लांबवून केला ११ लाख ५२ हजारांचा अपहार !
1xbet russia

ट्रॅक्टर पलटी झाल्याने २० वर्षीय तरुणाचा मृत्यू

May 12, 2026
जळगाव: मेहरूण परिसरातून ५५ हजारांची ‘बुलेट’ लंपास; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा
1xbet russia

एमआयडीसी परिसरात तरुणावर धारदार वस्तूने हल्ला

May 12, 2026
तरुणाला अडवून मोबाईल हिसकावला ; चार अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा
1xbet russia

जळगाव शहरात तरुणाला लाकडी दांड्याने  बदडले ; तिघांविरुद्ध गुन्हा

May 12, 2026
रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त
1xbet russia

चाळीसगावात किरकोळ कारणावरून मारहाण; एकाविरुद्ध गुन्हा

May 12, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

ग्राहकांकडून गोळा केलेले हप्ते परस्पर लांबवून केला ११ लाख ५२ हजारांचा अपहार !

ट्रॅक्टर पलटी झाल्याने २० वर्षीय तरुणाचा मृत्यू

May 12, 2026
जळगाव: मेहरूण परिसरातून ५५ हजारांची ‘बुलेट’ लंपास; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा

एमआयडीसी परिसरात तरुणावर धारदार वस्तूने हल्ला

May 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon