नागपूर (वृत्तसंस्था ) ;- कोरोना लसीकरण मोहीमेवरच सध्या सगळ्यांचं लक्ष आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लसीकरण हा सर्वात मोठा पर्याय असल्याचं संशोधनातुन समोर आलंय. कोरोनाच्या विळख्यात लहान मुलं येऊ नयेत म्हणून खबरदारी घेतली जात आहे. लहान मुलांना या कोरोनाचा धोका होऊ नये, म्हणून त्यांचं लसीकरण करणं गरजेचं आहे.
गेली दीड वर्ष झालं शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचं प्रचंड मोठं शैक्षणिक नुकसान होत आहे. म्हणूनच राज्य शासनाने 17 ऑगस्टपासुन शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. पण लहान मुलांचं लसीकरण झालं नसल्याकारणाने पालक चिंतेत आहेत. त्या सर्व पालकांसाठी लवकरच आनंदाची बातमी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे विद्यार्थी व पालकांना दिलासा मिळणार आहे.
विविध ठिकाणचे तज्ज्ञ डाॅक्टर याच कामात गुंतले आहेत. त्यातच ‘ऑक्टोबर- नोव्हेंबरपर्यंत कोव्हॅक्सिन लस लहान मुलांसाठी उपलब्ध होईल, तसेच लसीच्या चाचणीचा तीन महिन्यात येणाऱ्या अहवालावर आमची खुप आस आहे’, अशी आशा नागपुरात लहान मुलांवर कोव्हॅक्सिन कोरोना लसीची चाचणी करणारे डॉ. वसंत खळतकर यांनी व्यक्त केली आहे. ते मुलांवरील आजाराचे तज्ज्ञ आहेत.
कोरोना टास्क फोर्सने पण याबाबत चांगली बातमी दिली आहे. सुप्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ आणि महाराष्ट्र कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. बकुळ पारेख यांनी सांगितलं कि, येत्या काही महिन्यातच म्हणजे सप्टेंबरच्या शेवटी किंवा ऑक्टोबरच्या सुरूवातीला आपल्या राज्यात लहान मुलांचं लसीकरण सुरू होईल.