चोपडा तालुक्यातील कृष्णापुर येथील घटना
चोपडा (प्रतिनिधी) : घरातून बेपत्ता असलेल्या चौगांव येथील ३५ वर्षीय तरुणाचा कृष्णापूर येथील पांझर तलावात बुडून मृत्यू झाला. ही घटना दि. ३ जुलै रोजी उघडकीस आली. याप्रकरणी चोपडा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
विजय भगवान कोळी (वय ३५, रा. चौगावं ता. चोपडा) असे मयत तरुणाचे नाव आहे. तो गावात परिवारासह राहत होता. विजय कोळी हे दि. २ रोजी पासून बेपत्ता होते. कुटुंबियांकडून त्यांचा शोध घेतला जात होता, मात्र ते मिळून आले नाहीत. दरम्यान, दि. ३ रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास कृष्णापूर येथील पांझर तलावात विजय कोळी या तरुणाचा मृतदेह मिळून आला. पंचनामा केल्यानंतर विजय कोळी याचा मृतदेह चोपडा उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला.
याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याची तपासणी करीत मयत घोषीत केले. याप्रकरणी चोपडा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान तरुणाचा मृत्यू कसा झाला याबाबत माहिती मिळाली नाही.