जळगाव शहरातील शिव कॉलनीतील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील शिवकॉलनी परिसरातून पायी जात असलेल्या वृध्द महिलेच्या गळ्यातील १ लाख ३० हजार रुपये किमतीचे सोन्याची चैन जबरी हिसकावून चोरून नेल्याची धक्कादायक घटना दि. २६ मे रोजी रात्री ८ वाजता उघडकीला आली आहे. याप्रकरणी बुधवारी दि. २९ मे रोजी दुपारी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील शिव कॉलनी परिसरात विनोद प्रभाकर बाविस्कर यांच्या वृध्द आई पायी जात असताना अज्ञात २ जणांनी त्यांच्या गळ्यातील १ लाख ३० हजार रुपये किमतीची सोन्याची चैन ओढून चोरून नेली. ही घटना घडल्यानंतर विनोद बाविस्कर यांनी बुधवार दि. २९ मे रोजी रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात दोन जण विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कैलास दामोदरे हे करीत आहे.